SIP Investment Formula: गेल्या काही महिन्यातील बाजारातील चढ-उतारातही एसआयपी गुंतवणुकीकडे लोकांची ओढ कमी झालेली नाही. पण, SIP मधून मिळणारा कमी परतावा पाहून प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रश्न पडतो की अशा स्थितीत, काय करायचं? म्युच्युअल फंडात ‘Stay’ किंवा ‘Switch’ करण्याचा गुप्त फॉर्म्युला जाणून घेऊया, जो लक्षणीय परतावा मिळवून देऊ शकतो.

एसआयपी परताव्यात तात्पुरता तोटा होणं सामान्य आहे, पण तुम्हाला हुशार गुंतवणूकदार बनायचं असेल तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सध्याच्या म्युच्युअल फंडात कधी टिकून राहणं – Stay – करणं फायदेही आहे आणि अधिक चांगल्या फंडात गुंतवणूक करणे म्हणजे Switch करणे केव्हा योग्य आहे.
Oil Crisis : तिकडे होर्मुझमध्ये जहाजांच्या रांगा, इकडे ‘सेफ्टी बफर’ रिकामा; IMF ने म्हटले जागतिक बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर
तुमच्या समोरही असाच गोंधळ असेल तर, यासाठी एक फॉर्म्युला आहे, जो बाजारातील अल्पकालीन चढ-उतार आणि फंडाची दीर्घकालीन खराब कामगिरी यांच्यात स्पष्टपणे फरक करतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांची कष्टाची कमाई तोट्यात धुवून जात नाही.
म्युच्युअल फंडमध्ये Stay फॉर्म्युला काय आहे?
अख्ख्या शेअर बाजारात मंदी आहे किंवा बाजार घसरणीतून जात असल्यामुळे तुमची SIP तोट्यात असेल, तर गुंतवणूक कायम ठेवणेच सर्वात शहाणपणाचा निर्णय आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला बाजारातील घसरणीच्या काळात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा सर्वात जास्त फायदा मिळतो आणि मासिक गुंतवणुकीवर तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात, ज्यामुळे भविष्यात बाजार सावरल्यावर तुमचा परतावा अनेक पटींनी वाढतो.
Switch फॉर्म्युला काय आहे?
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बाजार सातत्याने तेजीची उभारी घेत आहे, पण फंडाने त्याच्या बेंचमार्क निर्देशांक – जसे की निफ्टी50 किंवा सेन्सेक्स आणि त्याच श्रेणीतील इतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडांच्या तुलनेत सातत्याने कमी परतावा दिला असेल, तर तुम्ही त्या फंडमधून बाहेर पडून दुसऱ्या स्कीममध्ये Switch करणे योग्य निर्णय आहे.
तसेच फंड व्यवस्थापकातील बदल, फंड हाऊसच्या गुंतवणूक धोरणातील मोठा बदल, किंवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक पसंती आणि जोखीम प्रोफाइलमधील बदल पाहूनही तुम्ही तुमच्या सध्याच्या म्युच्युअल फंड स्कीममधून स्विच करण्याचा निर्णय घेऊ शकता.
फंडमधून एक्झिट करण्याआधी काय करायचे
कोणत्याही म्युच्युअल फंडमधून एक्झिट किंवा स्विच करताना गुंतवणूकदारांनी काही तांत्रिक आणि टॅक्स-संबंधित बाबींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लक्षात घ्या की कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडात, 1 वर्षाच्या आत युनिट्स विकले किंवा स्विच केले, तर 1% एक्झिट लोड आकारला जाऊ शकतो. याशिवाय 1 वर्षापूर्वी झालेल्या नफ्यावर शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि 1 वर्षानंतर 1.25 लाखांपेक्षा जास्त नफ्यावर लाँग-टर्म कॅपिटल गेन टॅक्सदेखील आकारला जाऊ शकतो.

