![]()
लहानपणापासून मला श्रीजगन्नाथांच्या अनेक प्रार्थनाआणि भजने पाठ आहेत. शाळा आणि महाविद्यालयात शिकत असताना मी भजने गात असे. जगन्नाथांचे भजन गाऊन मला आनंद मिळायचा. महाप्रभू माझ्या अगदीजवळ असल्याची अनुभूती यायची. आता मी गाणी गात नाही; पण सकाळ-संध्याकाळ महाप्रभूंचे स्मरण करूनत्यांची भजने गुणगुणते. मला वाटते, महाप्रभू प्रत्येक क्षणीमाझ्या आसपासच आहेत. संकटसमयी ते मला मदतकरतात. भक्तकवी मधुसूदन राव यांचे हे गीत आजही मीमनोमन गाते : “मेरे पास दिन-रात रहते हैं महाप्रभु परमेश्वर,यह बात याद कर हृदय में पूजूंगा उन्हें निरंतर।”
समजण्याइतकी मोठी होईपर्यंत मी जगन्नाथांना ओळखूलागले होते. आमच्या घरी त्यांची नेहमी चर्चा होत असे.गावातील प्रत्येक वाडीत त्यांच्या महिम्याचे वर्णन केलेजाई. मी गावातील शाळेत शिकत असताना भक्तसालबेग यांची //”आहे नीड़ो शोइड़ो’ ही प्रार्थना गायलीजायची. शाळेतील शिक्षक जगन्नाथांबद्दल अनेक गोष्टीसांगत असत. पुरीमध्ये खूप मोठे मंदिर आहे; इतके मोठेमंदिर दुसरीकडे नाही. त्या मंदिरात श्रीजगन्नाथ आपलीबहीण सुभद्रा आणि थोरले भाऊ बलराम यांच्यासह पूजलेजातात. जगन्नाथांचा वर्ण काळा, डोळे गोल-गोल.सुभद्रेचा वर्ण पिवळा, तर बलभद्र चांदणीच्या फुलासारखेशुभ्र. ती प्रतिमा एकदा पाहिली की कधी विसरता येतनाही. सर असेही सांगत असत की, जगन्नाथ म्हणजे‘महाप्रभू’, त्यांचा प्रसाद म्हणजे ‘महाप्रसाद’, त्यांचे मंदिरम्हणजे ‘मोठे मंदिर’, त्यांचा मार्ग म्हणजे ‘विशाल पथ’(‘बोडो दांडो’) आणि त्यांचा समुद्र म्हणजे ‘महोदधी’. मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेड़ा गावापासून पुरुषोत्तम क्षेत्रपुरी खूप दूर होते. त्यामुळे ते पाहण्याची संधी मला कुठून मिळणार? पण नंतर मी भुवनेश्वरला गेले आणि युनिट-2 गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वसतिगृहात राहूलागले. त्यानंतर मला पुरी, भुवनेश्वर व कोणार्कपाहण्याची संधी मिळाली. पहिल्या जगन्नाथ दर्शनाची आठवण आजही माझ्या मनातून पुसली गेलेली नाही.इतके भव्य मंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे विसरतायेईल का? रथयात्रा विसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारा महिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात. पण रथयात्रेचे वैभव काही वेगळे असते. वर्षभर भक्त मंदिरात जाऊन महाप्रभूंचे दर्शन घेतात. पण वर्षातून एकदा महाप्रभूआपल्या भव्य मंदिरातून बाहेर येतात आणि ‘विशाल पथ’ (‘बोडो दांडो’) वर येऊन भक्तांना दर्शन देतात. तीनरथांवर तीन देवता चक्रराज सुदर्शनासह गुंडिचा मंदिराकडे प्रस्थान करतात. तेथे सात दिवस वास्तव्य करून पुन्हापरत येतात. महाप्रभूंचे हे महापर्व अतुलनीय आहे. लहानपणापासून मी जगन्नाथांची भक्त आहे. ते सदैवमाझे परम आराध्य आहेत. माझ्या जीवनातीलचढ-उतारांचे नियंता तेच आहेत. माझ्या सुख-दुःखाचे कर्ते-धर्ते तेच आहेत. आयुष्यात मी अनेक कष्ट सोसले आहेत. त्या सर्व भीषण दुःखांतून महाबाहूंनीच मला बाहेर काढले. कारण मी त्यांचीच मुलगी आहे! मलाराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित करण्यात आले, त्याक्षणी मी महाप्रभूंचे स्मरण केले. ‘प्रभू, तुम्ही मला इतक्याउंच स्थानावर नेत आहात; प्रत्येक पावलावर मला आधारद्या, सदैव माझ्यासोबत राहा,’ हीच माझी प्रार्थना होती.त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आणि आजही ऐकत आहेत.राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून मी दिल्लीत असतानारथयात्रेचा महोत्सव आला. पण पुरीला जाणे शक्य नव्हते.रथयात्रेच्या दिवशी पहाटेच दिल्लीतील हौजखास येथीलजगन्नाथ मंदिरात जाऊन मी महाप्रभूंचे दर्शन घेतले. माझेमन आनंदाने भरून गेले. त्यांच्या कृपेचा वर्षाव माझ्यावरझाला. मोठ्या आत्मविश्वासाने मी माझा उमेदवारी अर्जदाखल केला. प्रचंड उत्साहाने निवडणूक प्रचारातसहभागी झाले. 25 जुलै 2022 रोजी संसदेच्या सेंट्रलहॉलमध्ये शपथ घेण्यासाठी जात असताना मी सततजगन्नाथांची प्रार्थना करत होते. त्यांच्या आशीर्वादामुळेमाझा शपथविधी अत्यंत उत्तम प्रकारे पार पडला. राष्ट्रपतीम्हणून माझे पहिले भाषण करतानाही ते माझ्यासोबतचअसल्याची मला जाणीव होत होती. पुरीला जाऊनमहाप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी माझे मन व्याकूळ झाले होते.दिवस जात होते; पण मला पुरीला जाता येत नव्हते. मलावाटले ते बोलवत नाहीत तोवर त्यांच्या भेटीस कोण जाऊशकतो? मी मनोमन त्यांना म्हणाले, ‘प्रभू, माझ्याकडूनकाही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मला पुरीलाबोलवा, दर्शन द्या.’ ते भावाचे भुकेले आहेत. माझी भावनात्यांना कशी कळणार नाही? काहीच दिवसांत पुरीलाजाण्याचे ठरले. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 2022. पुरीतउतरल्यानंतर वाहनताफा श्रीमंदिराकडे निघाला.वाहनताफा पुरीच्या पवित्र विशाल मार्गावर पोहोचताचमाझ्या मनात एक विलक्षण भावना दाटून आली. हाविशाल मार्ग महाप्रभू जगन्नाथांचाच आहे. येथेप्रोटोकॉलची काय गरज? पुरी क्षेत्रराज म्हणून प्रसिद्धआहे. महाप्रभू देवाधिदेव आहेत. पुढचा विचारकरण्याआधीच मी गाडी थांबवली. माझी गाडी थांबताचमागील सर्व वाहनेही थांबली. मी अनवाणी पायांनी त्यापवित्र मार्गावर चालू लागले. श्रीमंदिर दोन किलोमीटर दूरहोते. मंदिरावरील नीलचक्र, पतितपावन ध्वजाकडे पाहतमी चालत राहिले. मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभ्याबालकांना, महिलांना, युवक-विद्यार्थ्यांना व ज्येष्ठांनानमस्कार करत पुढे जात होते. माझे संपूर्ण लक्षजगन्नाथांकडेच होते. श्रीमंदिराच्या सिंहद्वाराजवळपोहोचताच मी स्वतःला सावरू शकले नाही. तोपर्यंत मीस्वतःलाच विसरले होते. त्या पवित्र मार्गावरील धुळीतसाष्टांग दंडवत घालून मी महाप्रभूंना प्रणाम केला.मंदिरात प्रवेश केला. गर्भगृहात चतुर्धा मूर्तींचे दर्शन होताचमी आनंदाने भारावून गेले. महाप्रभू हे जगाचे नाथ आहेत.अनाथांचेही नाथ आहेत. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तेसदैव तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या गोल-गोलडोळ्यांच्या पापण्या कधी मिटत नाहीत. ते सर्वांकडे समानदृष्टीने पाहतात.समतेचा मंत्र देतात. त्यांच्या कृपेनेच मीसमाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पितकेले आहे. हात जोडून मी प्रार्थना केली, ‘हे महाबाहू,तुमच्या आशीर्वादाने माझ्यातील ही समर्पणाची भावनाकायम राहू दे. हे कृपानिधी, देश, जगावर कृपाछाया राहूदे!’ हे म्हणताना मी भक्तिभावाने पूर्णपणे भारावून गेले. रथयात्रेचे वैभव तर निराळे,अविस्मरणीय आहे…पहिल्या जगन्नाथ दर्शनाची आठवणआजही मनातून पुसली नाही. इतके भव्यमंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे कधीविसरता येईल का? त्यांची रथयात्राविसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारामहिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात.पण रथयात्रेचे वैभवच वेगळे असते.
Source link
द्रौपदी मुर्मू यांचा कॉलम:महाप्रभू माझ्या जीवनातील चढ-उतारांचे नियंता
