सोशल मीडियावर भाईगिरीचे किंवा दहशत माजवण्याचे व्हिडीओ बनवणाऱ्या तथाकथित भाईला सुपा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कशासाठी करावा? हे आपण ठरवायला हवं. इंटरनेटमुळे संपूर्ण जगाच्या माहितीचे दरवाजे खुले झाले आहेत. जगात कुठलीही अशी गोष्ट नसेल ज्याचं उत्तर इंटरनेटवर मिळणार नाही. केवळ माहिती मिळवणेच नाही तर मनोरंजनाची मोठी साधने इंटरनेटवर उपलब्ध आहे. इंटरनेवर शिक्षण देखील उपलब्ध आहे. अनेक तरुण-तरुणी ऑनलाइन शिक्षण घेतात. अनेक जण विविध कोर्सेस हे ऑनलाइन पूर्ण करतात आणि याच ऑनलाइन माध्यमातून गलेलठ्ठ पगाराची नोकरीदेखील मिळवतात. त्यामुळे या माध्यमाचा आपल्याला फायदाच होतो. पण काही जण या माध्यमाचा चुकीचा वापर करतात. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.
आम्ही हे सर्व सांगण्यामागे देखील एक कारण आहे. बारामतीत एका तरुणाने सोशल मीडियावर दहशत निर्माण होईल असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांना याची मिळताच या तरुणाच्या विरोधात कठोर पावलं उचलली. या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोशल मीडियावर तु्म्ही मनोरंजनात्मक किंवा माहिती देणारे व्हिडीओ शेअर करु शकतात. पण दहशत माजवणारे व्हिडीओ शेअर केले तर त्यांची खैर होणार नाही, असा मेसेजच सुपा पोलिसांनी आपल्या कारवाईतून दिली.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात शस्त्र घेऊन रील बनविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर असलेली रील प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक देखील केली आहे.
तरुणाच्या व्हिडीओत नेमकं काय होतं?
पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास 24 ऑगस्ट रोजी ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ आला. बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन हा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर तसेच ‘जंगल अपना है, और कानून भी अपना है’ अशा धमकीवजा आशयाचा वापर करण्यात आला होता.
पोलिसांनी काय कारवाई केली?
या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 251(2)(3), 223, भारतीय शस्त्र कायदा कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली.
पोलिसांचा असे व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांना इशारा
सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन करून ‘आभासी भाईगिरी’ दाखविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा