Headlines

सूर्यकुमारची पहिली कमाई किती होती माहितीये का? टीम इंडियात कमबॅकसाठी कसा धडपडतोय, काय म्हणाला सूर्यादादा?


Suryakumar Yadav On First Salary : टीम इंडियात पुनरागमनासाठी सूर्यकुमार यादव अजूनही प्रयत्नशील आहे. आकाश चोप्राच्या शोमध्ये बोलताना त्याने आपल्या संघर्षासह पहिल्या मानधनाचा किस्साही सांगितला.

Suryakumar Yadav First Salary
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघात नेहमीच मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदावरून अचानक हटवण्यात आल्यानंतर सूर्यकुमार यादवने आजवर मौन बाळगले होते. मात्र, आता पहिल्यांदाच त्याने या संपूर्ण प्रकारावर आणि आपल्या कारकिर्दीतील संघर्षावर उघडपणे भाष्य केले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या शोमध्ये बोलताना सूर्याने आपली पहिली कमाई आणि टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठे खुलासे केले आहेत.

१५ हजारांची पहिली कमाई अन् क्रिकेट किट…

आपल्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाबाबत बोलताना सूर्याने आपल्या पहिल्या मानधनाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मुंबईकडून अंडर-१५ क्रिकेट खेळताना मला पहिल्यांदा १५ हजार रुपये मानधन मिळाले होते. हे पैसे संपूर्ण मालिका संपल्यानंतर मला एकत्र मिळाले होते. त्यावेळी मला कोणीही स्पॉन्सर करत नव्हते, त्यामुळे ते सर्व पैसे मी फक्त क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि साहित्यांच्या खरेदीवर खर्च केले.” दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्येही सूर्याला धावा करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

Maharashtra TimesAnaya Bangar : अनाया बांगर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला भिडली, परवानगी नाकारण्याच्या मागणीला दिलं सडेतोड उत्तर, स्पष्टच बोलली…

‘मी खूप संघर्ष करतोय…’

कर्णधारपद जाणे आणि सध्याच्या खराब फॉर्मबाबत सूर्याने अत्यंत प्रांजळपणे आपले मत मांडले. “मी सध्या खूप संघर्ष करत आहे आणि भविष्यात सर्व काही ठीक होईल, अशी मला अपेक्षा आहे. टीम इंडियामध्ये परतण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे आणि जे काही शक्य आहे, ते सर्व करत आहे. जर सर्व काही ठीक राहिले, तर गोष्टी पुन्हा पूर्वपदावर येतील,” असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला.

बीसीसीआयचे दरवाजे अद्याप खुले

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज असलेल्या सूर्याने जवळपास तीन वर्षांपूर्वी (२०२३ मध्ये) भारतासाठी आपला शेवटचा कसोटी आणि वनडे सामना खेळला होता. तो सध्या टीम इंडियाच्या नियोजनाचा भाग नसला तरी, बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra TimesENG vs PAK Test : TVवर मुलाखत सुरू होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंग्लंडला कसोटीवर बहिष्कार टाकण्याची धमकी; ENG-PAK दुसऱ्या कसोटीआधी मोठा ड्रामा

जर सूर्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडला आणि आपला जुना फॉर्म परत मिळवला, तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. त्याच्या दमदार प्रदर्शनावरच त्याचे पुनरागमन अवलंबून असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा