![]()
नो-कॉस्ट EMI मुळे फोल्डेबल फोन्स बजेटमध्ये: सामसंगने (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी 30 महिन्यांचा ‘नो-कॉस्ट EMI’ (No-Cost EMI) प्लॅन आणला आहे, ज्यामुळे महागडे फोल्डेबल स्मार्टफोन्स खरेदी करणे आता अधिक परवडणारे आणि सोपे झाले आहे.
Galaxy Z Fold8 Ultra चा हप्ता: या स्मार्ट प्लॅन अंतर्गत, सामसंगचा प्रीमियम Galaxy Z Fold8 Ultra फोन आता अवघ्या 6,667 रुपये प्रतिमहिना हप्त्यावर उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, मागील ‘Galaxy Z Fold7’ च्या तुलनेत या नवीन फोनचा मासिक हप्ता तब्बल 9 टक्क्यांनी कमी झाला आहे.
Galaxy Z Fold8 आणि Z Flip8 चे प्लॅन्स: याच 30 महिन्यांच्या आकर्षक फायनान्स प्लॅनमुळे Galaxy Z Fold8 चा हप्ता अवघा 6,000 रुपये प्रतिमहिना आणि Galaxy Z Flip8 चा हप्ता अवघा 4,167 रुपये प्रतिमहिना इतका कमी असणार आहे.
Samsung आपल्या Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 या मॉडेल्ससाठी 30 महिन्यांचे नो-कॉस्ट EMI (व्याजमुक्त हप्ते) पर्याय आणून प्रीमियम स्मार्टफोन खरेदीचा अनुभव पूर्णपणे बदलत आहे. या सुविधेमुळे सामसंगचे हे नवनवीन फोल्डेबल फोन्स ग्राहकांच्या बजेटमध्ये आले आहेत. मासिक हप्त्यांचा बोजा कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या या नवीन फायनान्स प्लॅन्समुळे, आता ग्राहक Zero Down Payment (कोणतेही आगाऊ पैसे न देता) अंतर्गत गॅलेक्सी एआय (Galaxy AI) युक्त नवीन ‘Galaxy Z’ सिरीजचा अनुभव घेऊ शकतील.
फोल्डेबल तंत्रज्ञानातील सलग 7 Generations नवसंशोधनाचा अनुभव आणि युजर्सच्या अभिप्रायावर (Feedback) आधारित, सामसंगची ही नवीन ‘Galaxy Z’ सिरीज आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट फोल्डेबल अनुभव देते. यामध्ये विशेष स्वरूपात डिझाइन केलेले ‘Galaxy AI’ तंत्रज्ञान, मजबूत हिंज डिझाइन (Hinge Design), उत्कृष्ट डिस्प्ले, टिकाऊपणा (Durability) आणि दमदार परफॉर्मन्स यांचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. हा नवीन फायनान्स प्लॅॅन केवळ फोनपुरता मर्यादित नसून, सामसंगचे हे प्रगत फोल्डेबल तंत्रज्ञान ग्राहकांना सहजपणे खरेदी करता यावे, यासाठी तयार करण्यात आला आहे
30 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI (व्याजमुक्त) प्लॅन Samsung Finance+ (DMI Finance च्या सहकार्याने), TVS Credit, IDFC FIRST Bank आणि Poonawalla Fincorp यांच्यामार्फत उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे ग्राहकांना Samsung चे हे नवीन फोल्डेबल फोन्स खरेदी करण्यासाठी अधिक चांगला पर्याय आणि आर्थिक लवचिकता (Flexibility) मिळत आहे.
हा 30 महिन्यांचा दीर्घ मुदतीचा प्लॅन ग्राहकांना फोनची एकूण किंमत बऱ्याच मोठ्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा देतो. परिणामी, ग्राहकांना ‘Galaxy AI’ ची नवनवीन फीचर्स, प्रीमियम डिझाइन आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्सचा आनंद घेत हे महागडे फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.
किंमत आणि उपलब्धता
Galaxy Z Fold8 Ultra: हा फोन व्हायोलेट शॅडो (Violet Shadow), ग्रॅफाइट (Graphite), क्रीम (Cream) आणि ग्रीन शॅडो (Green Shadow – केवळ ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध) या रंगांमध्ये मिळेल. याची सुरुवातीची किंमत 1,99,999 रुपये आहे.
Galaxy Z Fold8: हा फोन लॅव्हेंडर (Lavender), ग्रॅफाइट (Graphite), क्रीम (Cream) आणि पिस्ताचिओ (Pistachio – केवळ ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध) या रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 1,79,999 रुपये आहे.
Galaxy Z Flip8: हा फोन पिंक (Pink), ग्रॅफाइट (Graphite), क्रीम (Cream) आणि मिंट (Mint – केवळ ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध) या रंगांमध्ये खरेदी करता येईल. याची सुरुवातीची किंमत 1,24,999 रुपये आहे.
