Headlines

शेफाली वर्माच्या अर्धशतकानंतर भारताची घसरगुंडी, थायलंडला दिलं १६० धावांचं आव्हान


IND W vs THAI W News : थायलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली, पण शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीचा डाव अचानक कोलमडला. नेमकं काय घडलं?

India Women vs Thailand Women
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महिला आशिया चषक २०२६ मधील थायलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. सुरुवातीला स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर भारतीय डावाला मोठी गळती लागली. शेवटच्या सात विकेट्स भारताने अवघ्या २९ धावांच्या अंतरात गमावल्या. त्यामुळे एकवेळ मोठी धावसंख्या उभारण्याच्या स्थितीत असलेला भारतीय संघ १५९ धावांवर थांबला.

मानधनाचं रनआउट, प्रतिकाला संधी

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताला स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, १९ धावांवर मंधाना धावबाद झाली. जेमिमा रॉड्रिग्ज दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नसल्याने प्रतिका रावलला टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. प्रतिकाने शेफालीसोबत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra TimesIND W vs THAI W : भारताला सुरुवातीलाच धक्का; सीमेवरून थायलंडच्या खेळाडूचा अफलातून थ्रो, स्मृती मंधाना आऊट

शेफालीचं शानदार अर्धशतक

शेफाली वर्माने मात्र आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. तिने अवघ्या २६ चेंडूंमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १९वे अर्धशतक पूर्ण केले. तिच्या फटकेबाजीमुळे भारत मोठी धावसंख्या उभारेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेफाली बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची लय अचानक बिघडली.

शेवटच्या ७ विकेट्स २९ धावांत

मधल्या फळीत भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विकेट्सची मालिका सुरू झाल्यानंतर भारताला वेगाने धावा करता आल्या नाहीत. अखेरच्या सात विकेट्स भारताने फक्त २९ धावांच्या आत गमावल्या. त्यामुळे १७० ते १८० धावांच्या आसपास जाण्याची शक्यता असलेला भारतीय संघ १५९ धावांवरच थांबला.

Maharashtra TimesSunil Gavskar : ‘कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये नो बॉलला फ्री हिट नकोच, मला तर वाटतंय की…’; सुनील गावसकरांनी सुचवला खतरनाक पर्याय

थायलंडसमोर १६० धावांचं लक्ष्य

थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नियमित कर्णधार नन्नापत कोंचारोएनकाई दुखापतीमुळे संघात नसल्याने थिपचा पुट्टावोंगकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. आता भारताच्या गोलंदाजांवर १५९ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी असेल. टी-२० क्रिकेटमधील अलीकडच्या निराशाजनक कामगिरीनंतर हरमनप्रीत कौरच्या संघासाठी या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा