Headlines

विराटची ‘वृंदावन’ भक्ती, अनुष्कामुळे कोहली बदलला? विरुष्काच्या श्रद्धेवर प्रश्न, मोहम्मद शमीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, काय म्हणाला?


Virat Kohli News :भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार फलंदाज विराट कोहली हा नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. तो केवळ क्रिकेटमधील त्याच्या खेळामुळेच नाही, तर त्याच्या आगळ्यावेगळ्या स्टायलिश लाइफस्टाईलमुळेही नेहमी चर्चेत राहिला आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे नेहमीच प्रेमानंद महाराज यांच्या दरबारात गेलेले दिसतात. याबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वक्तव्य केले आहे, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

virat kohli, mohammed shami, premanand maharaj
मुंबई : विराट आणि त्याची अभिनेत्री असलेली पत्नी अनुष्का सध्या विविध धार्मिक स्थळांना भेट देताना दिसत आहेत. त्यांचे प्रेमानंद महाराज यांच्यासोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. प्रेमानंद महाराज यांच्या वृंदावन येथील आश्रमात जाऊन ते जोडीने दर्शन घेत असतात. केवळ प्रेमानंद महाराजच नाही, तर देशातील इतरही अनेक धार्मिक स्थळांना या दांपत्याने भेटी दिल्या आहेत. ‘किंग कोहली’ क्रिकेटमधून मिळालेल्या थोड्याशा विश्रांतीनंतर भक्तीमध्ये तल्लीन झालेला दिसून येतो. विराटची ही श्रद्धा असली तरी अनेकदा ट्रोलर्स मात्र दोघांनाही ट्रोल करू लागतात.

मोहम्मद शमीचे टीकाकारांना उत्तर

या सगळ्यावर आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एक वक्तव्य केले आहे. याबद्दल बोलताना शमी आपल्या सहकाऱ्याच्या बचावात्मक भूमिकेत बोलताना दिसला. विराट आणि अनुष्काच्या धार्मिक भावनेवर बोलताना मोहम्मद शमीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

स्पोर्ट्स नाऊ या चॅनलशी बोलताना विराट कोहलीच्या आध्यात्मिक जगताविषयी मोहम्मद शमी म्हणाला, “लोकांना विराटबद्दल गैरसमज आहे. विराटची श्रद्धा एका दिवसात तयार झालेली नाही. तो कोणतीही गोष्ट करतो, त्यावेळेला त्याच्यामागे खूप मोठा अनुभव असतो. ज्या गोष्टींवर विराट विश्वास ठेवतो, त्या गोष्टींसाठी तो नक्कीच वेळ काढतो. त्याच्यातला हा बदल काय एका रात्रीत झालेला नाही.”

Maharashtra TimesAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेला का वाटतेय टीम इंडियाची चिंता? भारतीय क्रिकेटमध्ये काय गंडतंय, निवृत्तीनंतर पहिल्यांदाच थेट बोलला

“इतर कोणत्याही व्यक्तीला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही”

विराट आणि अनुष्काच्या वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या भेटीबद्दल शमीने म्हटले, “एखाद्या व्यक्तीचा एखाद्या शक्तीवर विश्वास असेल तर त्याला प्राधान्य देणे अगदी योग्य आहे. त्यामध्ये कोणत्याही इतर व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा कोणताही अधिकार नाही.”

Maharashtra TimesMohammad Kaif News : फुल्ल फॉर्ममधल्या वैभवला ड्रिंक्ससाठी ठेवलंत? मॅनेजमेंटचं गणितच चुकलं! आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यातल्या चुकांवर माजी क्रिकेटरचा संताप

अनुष्का शर्माला टार्गेट करण्यावर शमीचे स्पष्टीकरण

या सगळ्या प्रकरणात अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला टार्गेट केले जाते. असे म्हटले जाते की, अनुष्का विराटच्या आयुष्यात आल्यापासूनच विराट एवढा आध्यात्मिक झाला आहे. परंतु “हे असे नाहीये,” असे सांगताना शमीम्हणाला, “जर ते दोघे पती-पत्नी आहेत आणि पत्नीच्या सांगण्यावरून जरी कोहलीने असे केले असेल, तरी त्यात अडचण काय आहे? लोकांना यात अडचण का आहे, हे मला समजत नाही.”