Team India player one match and never played again : भारतसाठी खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं, ण पदार्पण केल्यावर पुन्हा कधीच खेळण्याची संधी न मिळालेले खेळाडूही आहेत. असे पाच खेळाडू आहेत ज्यांच्यावर ही वेळ आली. यामधील एकाने तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये २० वर्षे घालवली पण त्याला परत खेळायला मिळायला नाही.

उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने २००९ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. भारत आणि श्रीलंकेमध्ये हा सामना झाला होता. या सामन्यात सुदीपने पदार्पण करताना ६३ धावा दिल्या होत्या. पण एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर दुखापतींमुळे तो अनेकदा सामन्यांसाठी मुकलेला. त्यानंतर सुदीपला पुन्हा संघात जागा मिळाली नाही. एकच सामना खेळून बाहेर पडलेला सुदीप भारतासाठी फक्त एकच सामना खेळू शकला.
IND vs SL Test Series : भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये भरारी नाहीच पण हरल्यावर मोठा फटका, कारण काय? जाणून घ्या
विदर्भाचा प्रसिद्ध खेळाडू माजी कर्णधार राहिलेल्या फैज फजलसुद्धाही एकच सामना खेळू शकला. जवळपास दोन दशके त्याने विदर्भाकडून खेळताना संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९१८४ धावा केलेल्या फैज याने २४ शतके आणि ३९ अर्धशतके केली होती. आपल्या नेतृत्वात फैजने विदर्भाला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकवले होते. फैजने भारतासाठी वयाच्या ३० व्या वर्षी पदार्पण केले होते. २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध नाबाद ५५ धावा करत विजय मिळवून दिला होता. दुर्देवाने फैज एकच सामना खेळू शकला, पुन्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
Abhishek Porel Arrest : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप; महिलेच्या तक्रारीनंतर क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक
श्रीनाथ अरविंद याने २ ऑक्टोबर २०१५ ला दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० सामन्यात पदार्पण केले होते. फाफ डू प्लेसिस याला अरविंदने आऊट केले होते. श्रीनाथलाही पदार्पण सामन्यानंतर पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली नाही. २०११ च्या आयपीएल सीझनमध्ये श्रीनाथने १३ सामन्यात २१ विकेट नावावर केल्या होत्या. २०१८ मध्ये श्रीनाथ याने कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यावर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
Bodhana Sivanandan Shreyas Royal : भारतीय वंशाच्या दोन युवकांचा ब्रिटिश बुद्धिबळात डंका; 11 वर्षांच्या बोधनाने रचला इतिहास, 17 वर्षीय श्रेयसही चॅम्पियन
पंजाबचे माजी क्रिकेटर पंकज धर्माणी यांनी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनाच्या जोरावरच त्यांनी भारतीय संघात जागा मिळवली होती. १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पंकज यांना वनडे सामन्यात भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यामध्ये सहाव्या क्रमांकावर त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली होती. परंतु ८ धावा करून ते आऊट झाले होते. त्यानंतर नयन मोगिंया हे संघात परतल्याने धर्माणी यांना पुन्हा संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
Ajinkya Rahane : काय रे! निवृत्तीनंतर मला पहिला फोन सचिन पाजीचा आलेला, एकच गोष्ट बोलले; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा
१९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध रॉबिन सिंह ज्युनियर यांनी भारतासाठी पहिला सामना खेळला होता. मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर रॉबिन यांनी वनडे सामना खेळत पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यातच त्यांनी ७ ओव्हरमध्ये ५१ धावा दिल्या होत्या मात्र एकही विकेट घेता आली नव्हती. निवडकर्त्यांनी त्यानंतर पुन्हा त्यांना संधी दिली नाही, पदार्पण सामनाच त्यांचा अखेरचा ठरला.

