हायकोर्टाच्या लिपिक व टायपिंग पदाच्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. 16 ऑगस्टला राज्यभरात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अमरावती आणि अकोला यासह अनेक केंद्रांवर मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या मदतीला आले आहेत. दिपकेंनी आठवडाभराची मुदत देत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.