Headlines

परळीत होणार पशुवैद्यक महाविद्यालय; पार पडले भूमिपूजन, महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्याची मागणी


Beed News: परळी वैजनाथ येथे होणाऱ्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. ६३४ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात येणाऱ्या या महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व आजी माजी खासदार उपस्थित होते.

_पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,बीड :परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले.

पंकजा मुंडे , धनंजय मुंडे यांची़ उपस्थिती

कार्यक्रमास राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार संजय दौंड, बदामराव पंडित, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलिस अधीक्षक नवनीत कावत, अजय मुंडे आणि अक्षय मुंदडा उपस्थित होते.

मराठवाडा ही कष्टाची खाण आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा राज्य असून, मराठवाडा ही कष्टाची खाण आहे. शेतीला मुख्य आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील युवक-युवतींना हेआंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय उपलब्ध होत आहे.यामुळे अत्याधुनिक शिक्षण आणि सुविधा मिळतील, ज्याचा फायदा लगतच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही होईल.’

Maharashtra TimesPune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तन

६३४ कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीतून सुसज्ज इमारत उभारली जाणार

त्या पुढे म्हणाल्या, ‘६३४ कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीतून सुसज्ज इमारत, वसतिगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. परिणामी, परिसरातील ५० ते १०० गावांतील जनावरांवर आधुनिक उपचार परळी येथेच उपलब्ध होतील; तसेच दुग्धोत्पादन वाढ आणि फायदेशीर शेळीपालनावर विशेष संशोधन केले जाईल.’

स्वावलंबी मराठवाडा

या महाविद्यालयाचे बांधकाम अत्यंत दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, ‘समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावरे आणि स्वावलंबी मराठवाडा’ घडवण्याचा संकल्प या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवला.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात पावसाने फिरवली पाठ; पावसाअभावी पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत

पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्याची मागणी

या प्रसंगी आमदार धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना, ‘बारामती येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत अजित पवार यांचे; तर परळी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे,’ अशी मागणी केली.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा