Headlines

मोगऱ्याला पानं खूप पण फुलं येत नाहीत? हे खत वापरून पाहा झाड बहरून जाईल राजश्री पाटील यांनी सांगितला उपाय


How to care for jasmine plant to induce blooming : मोगरा हे भारतीय घरांमध्ये आवर्जून लावले जाणारे सुगंधी फुलझाड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मोगऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा दरवळ संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकतो. अनेकजण बाल्कनी, टेरेस किंवा घराच्या बागेत मोगऱ्याची लागवड करतात. मात्र अनेकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की झाडाला भरपूर पाने येतात, वाढ चांगली होते, पण फुले मात्र येत नाहीत. अशा वेळी योग्य काळजी आणि काही घरगुती उपाय केल्यास मोगऱ्याला भरपूर फुलांचा बहर येऊ शकतो.

Best Organic Fertilizer for Jasmine Plant
फोटो सौजन्य :- @iStock
मोगऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा दरवळ संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकतो. देवपूजा, गजरे, सजावट आणि सुगंधासाठी मोगऱ्याच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. अनेकजण बाल्कनी, टेरेस किंवा घराच्या बागेत मोगऱ्याची लागवड करतात. हे झाड कमी जागेतही सहज वाढते आणि योग्य काळजी घेतल्यास वर्षानुवर्षे भरपूर फुलांचा बहर देते. मात्र अनेकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की झाडाला भरपूर पाने येतात, वाढ चांगली होते, पण फुले मात्र येत नाहीत. काही वेळा झाड हिरवेगार दिसत असले तरी त्यावर कळ्याही लागत नाहीत. यामागे अपुरा सूर्यप्रकाश, अति पाणी, मातीतील पोषक घटकांची कमतरता, मुळांजवळील घट्ट माती किंवा कीड-रोगांचा प्रादुर्भाव अशी अनेक कारणे असू शकतात. विशेषतः कुंडीत लावलेल्या मोगऱ्याच्या झाडांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

मोगऱ्याला भरपूर फुले यावीत यासाठी झाडाला दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. तसेच माती भुसभुशीत आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. झाडाच्या मुळांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचला तर त्याची वाढ जोमदार होते आणि नवीन कळ्या तयार होण्यास मदत होते.सेंद्रिय खतांचा वापर केल्यास झाडाला फुलधारणा वाढते.योग्य काळजीबरोबरच काही सोपे घरगुती उपाय देखील मोगऱ्याच्या बहरासाठी प्रभावी ठरतात. हळद, मेथी दाण्यांची पावडर आणि निमखली यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे मातीची सुपीकता वाढते, मुळांचे आरोग्य सुधारते आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे मोगऱ्याचे झाड निरोगी राहून अधिक प्रमाणात फुलांची निर्मिती करते. (फोटो सौजन्य :- @iStock)

मोगऱ्याला फुले का येत नाहीत?

मोगऱ्याला फुले का येत नाहीत?

मोगऱ्याला फुले न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जास्त पाणी देणे, सूर्यप्रकाशाची कमतरता, माती घट्ट होणे, आवश्यक पोषक घटकांचा अभाव किंवा मुळांभोवती बुरशीजन्य संसर्ग होणे ही काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे सर्वप्रथम झाडाच्या वाढीचे निरीक्षण करून त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

माती सौल करणे आवश्याक

माती सौल करणे आवश्याक

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मोगऱ्याच्या कुंडीतील माती अनेकदा घट्ट होते. वरून माती कोरडी दिसत असली तरी आतमध्ये ओलावा टिकून राहतो. अशा वेळी माती हलक्या हाताने सैल करणे गरजेचे असते. यामुळे मुळांपर्यंत हवा पोहोचते आणि त्यांची वाढ चांगली होते.माती सैल करताना मुळांना इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. फक्त वरचा घट्ट थर हलका करून माती भुसभुशीत करावी. यामुळे झाडाची वाढ सुधारते आणि फुलधारणेसाठी योग्य वातावरण तयार होते.

पाण्याचे योग्य व्यवस्थापन

पाण्याचे योग्य व्यवस्थापन

मोगऱ्याला फुले यावीत यासाठी पाणी देण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः थंड वातावरणात वारंवार पाणी देऊ नये. जास्त पाण्यामुळे मातीमध्ये ओलावा वाढतो आणि बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता निर्माण होते. माती थोडी कोरडी झाल्यानंतरच पाणी द्यावे. पाण्याचा अतिरेक टाळल्यास मुळांची वाढ चांगली होते आणि झाड अधिक जोमाने फुलते.

पुरेसा सूर्यप्रकाश द्या

पुरेसा सूर्यप्रकाश द्या

मोगऱ्याला सूर्यप्रकाश खूप आवडतो. दिवसातून किमान दोन ते तीन तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुरेसा प्रकाश मिळत नाही, तेथे झाडाची वाढ होते; परंतु फुलधारणा कमी होते.म्हणून कुंडी अशा जागी ठेवावी जिथे सकाळचे ऊन मिळेल. सूर्यप्रकाशामुळे झाडाला आवश्यक ऊर्जा मिळते आणि नवीन कळ्या तयार होण्यास मदत होते.

मोगऱ्याला फुले येण्यासाठी उपाय

झाडासाठी घरी खत कसं तयार करावे

झाडासाठी घरी खत कसं तयार करावे

मोगऱ्याला फुले येण्यासाठी महागडी रासायनिक खते वापरण्याची गरज नसते. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तू झाडासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

१. हळद
हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. अर्धा चमचा हळद कुंडीतील मातीमध्ये मिसळल्यास मातीतील बुरशी, कीटक आणि रोगकारक घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.हा उपाय साधारणपणे पंधरा दिवसांतून एकदा करता येतो. त्यामुळे झाडाची मुळे निरोगी राहतात आणि वाढ चांगली होते.
२. मेथी दाण्यांची पावडर
मेथी दाण्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे घटक झाडाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात.एक चमचा मेथी दाण्यांची पावडर मातीमध्ये मिसळल्यास झाडाला आवश्यक पोषण मिळते. हा उपाय देखील पंधरा दिवसांतून एकदा करता येतो.

३. निमखली किंवा निंबोळी पेंड
निमखली ही मातीसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत मानली जाते. त्यामध्ये नैसर्गिक कीडप्रतिबंधक गुणधर्म असतात. एक चमचा निमखली मातीमध्ये मिसळल्यास झाडाला पोषण मिळते आणि मुळांवरील कीड नियंत्रणात राहते.

खत दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नका

खत दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नका

मेथी पावडर किंवा निमखली यापैकी कोणतेही खत दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. मातीमध्ये आधीच ओलावा असल्यास हे घटक हळूहळू मातीमध्ये मिसळून झाडाला लाभदायक ठरतात. लगेच पाणी दिल्यास त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा