Headlines

मुंबईची मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा लढा; फडणवीस सरकारविरोधात मैदानात – aaditya thackeray criticizes fadnavis government over mumbai’s open grounds



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलू नये, या मागणीसाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा आंदोलन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. जेन झीनं स्क्रीनवर नाही तर मैदानांवर असावं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. मागील ४ वर्षात मुंबईतील १७ हून अधिक मैदानांचं आरक्षण बदलल्याचा आरोप त्यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत