मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलू नये, या मागणीसाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा आंदोलन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. जेन झीनं स्क्रीनवर नाही तर मैदानांवर असावं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. मागील ४ वर्षात मुंबईतील १७ हून अधिक मैदानांचं आरक्षण बदलल्याचा आरोप त्यांनी केला.