Bharti Singh the indian game show:कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री भारती सिंग या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेळी एका वेगळ्या म्हणजेच निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे.

छोट्या पडद्यावर विनोदीशैलीनं आपली स्वतंत्र छाप उमटवणारी भारती सिंग आता कॉमेडियन आणि सूत्रसंचालकापलीकडे जाऊन निर्माती म्हणूनही नवी जबाबदारी सांभाळणार आहे. भूमिका बदलल्या, जबाबदाऱ्या वाढल्या तरी प्रेक्षकांना मनापासून हसवणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते. पण ‘निर्माती’ हा मोठा शब्द ऐकून जशी ग्लॅमरस प्रतिमा डोळ्यांसमोर येते, तशी काही भावना अजून आपल्याला आली नसल्याचं ती मिश्कीलपणे सांगते. निर्माती होणं ही जबाबदारी मोठी असल्याचं ती मान्य करते. कलाकार म्हणून स्वतःच्या कामाकडे लक्ष देणं वेगळं आणि निर्माती म्हणून संपूर्ण कामाची जबाबदारी घेणं वेगळं आहे. त्यातच दोन मुलांची आई म्हणून घर आणि काम यातील समतोल साधताना तिची धावपळ वाढली असल्याचं ती नमूद करते.
Kishore Kumar Family : किशोर कुमार यांचे पूर्वज होते डाकू? अभिनेते अशोक कुमार यांनीच मुलाखतीत केला होता खुलासा!
सूत्रसंचालक आणि कॉमेडियनहीच आपली मूळ ओळख असल्याचं भारती सांगते. ‘सूत्रसंचालन आणि विनोद करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण सूत्रसंचालन करताना मध्येच विनोद करायला मिळतो, त्याची मजाच काही वेगळीच असते’. कपिल शर्मा, सुदेश लहरी आणि जॉनी लीव्हर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते. “चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमाची शैली आणि त्यातील कलाकारांचं काम आवडायचं’, असं ती नमूद करते. विविध भाषांमधील विनोदाची शैली वेगळी असली, तरी प्रेक्षकांना हसवणं हा कॉमेडीचा समान धागा आहे, असं ती नमूद करते.
Kande Pohe Song: ‘कांदे पोहे’ सुनिधीला गायला द्यायची इच्छा नव्हती, ते अमृता सुभाषनं गायलं होतं’,अवधूत गुप्तेनं सांगितला ‘सनई चौघडे’ सिनेमातल्या सुपरहिट गाण्याचा किस्सा
आजच्या कॉमेडी शोज आणि त्यावर होणाऱ्या सेन्सॉरशिपच्या चर्चेवरही भारती स्पष्टपणे मत मांडते. ‘टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांचं स्वरूप वेगळं आहे. काय पाहायचं आहे, याचं प्रेक्षकांना स्वातंत्र्य असायला हवं. विनोदाच्या नावाखाली कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजीदेखील घेतली गेली पाहिजे’. सोनी टीव्हीवरील ‘ द इंडियन गेम शो ‘ या कार्यक्रमानिमित्त भारती आणि हर्ष तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. विविध कलाकारांसोबत खेळ, टास्क आणि भरपूर मस्ती असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. हा कार्यक्रम म्हणजे भारतीसाठी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं माध्यम आहे.

