Headlines

बजेट किमतीत प्रीमियम फीचर्स, ‘OnePlus N6’ ची भारतात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आले महत्त्वाचे फीचर्स। Maharashtra Times


स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘N-सिरीज’ सादर करत आहे. या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन OnePlus N6 येत्या 30 जून रोजी अधिकृतपणे लाँच केला जाईल. कंपनीने लाँचपूर्वीच या आगामी फोनचे डिस्प्ले, कॅमेरा आणि शक्तिशाली कूलिंग सिस्टीम यांसारखे महत्त्वाचे फीचर्स अधिकृतपणे जाहीर केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

OnePlus N6। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
वनप्लस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 30 जूनला लाँच होणाऱ्या नव्या OnePlus N6 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला अमोलेड (AMOLED) डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असून, यात 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ड्यूल-व्ह्यू व्हिडिओ मोडचा सपोर्ट देखील मिळणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

फोनबद्दल अनेक खुलासे

OnePlus N6 जूनच्या अखेरीस (30 जून) भारतात लाँच होणार आहे आणि कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमधील सर्वात स्वस्त मॉडेल असण्याची अपेक्षा आहे. लाँचिंगपूर्वी या फोनसाठी बनवलेल्या मायक्रोसाइटवरून फोनबद्दल अनेक खुलासे होत आहेत, जसे की आता या हँडसेटचा डिस्प्ले आणि कॅमेरा डिटेल्स समोर आले आहेत.

कंपनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये वनप्लस नॉर्ड सीई 6 प्रमाणेच बॅटरी असेल. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच डिस्प्ले कटआउट असेल.

OnePlus N6 स्पेसिफिकेशन्स (कन्फर्म)

मायक्रोसाइट अपडेट केली गेली आहे जी दर्शविते की या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश असेल आणि 1200 nits पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळेल. याशिवाय फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा (ज्याची अद्याप नोंद झालेली नाही) असेल.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 60 एफपीएस पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल आणि यात ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ मोड देखील मिळेल. थर्मल मॅनेजमेंटसाठी त्यात व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशन प्रदान केले जाईल.

‘हा’ फोन मीडियाटेक प्रोसेसरने सुसज्ज

कंपनीने नुकतीच घोषणा केली की OnePlus N6 भारतात फ्रेश मिंट आणि मिडनाइट ग्रीन या दोन रंगात लाँच केला जाईल. हा हँडसेट यापूर्वी गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी 6835 चिपसेट (जो मीडियाटेक डायमेंसिटी 6300 किंवा मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ एसओसी असू शकतो) सह स्पॉट केला गेला होता. तसेच, ग्राफिक्ससाठी 6 GB रॅम आणि एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू उपलब्ध असेल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 16 OSसह येऊ शकतो.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा