FIFA WC 2026 Winners Championship Rings : वर्ल्ड कप फुटबॉल विजेत्या संघास करंडक देण्यात येतो. तसेच प्रत्येक खेळाडूस सुवर्णपदक प्रदान करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत करंडक, सुवर्णपदकासह विजेत्या संघातील प्रत्येकाला ‘चॅम्पियनशिप रिंग’ही (अंगठी) दिली जाणार आहे. त्यासोबतच चाहत्यांनाही १९९६ रिंग्स दिल्या जाणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रथमच विजेत्या संघातील खेळाडूंना अंगठ्या अमेरिकेतील क्रीडाविश्वातील ही प्रसिद्ध परंपरा आता फिफा वर्ल्ड कपमध्ये आणली गेली आहे. हा वर्ल्ड कप २०२६मध्ये होत असल्याने, एकूण २०२६ अंगठ्या तयार करण्यात येत आहेत. यापैकी तीस अंगठ्या विजेत्यांना दिल्या जाणार आहेत, तर उर्वरित १९९६ अंगठ्या जगभरातील चाहत्यांसाठी उपलब्ध असतील.
अंगठीच्या एका बाजूला ट्रॉफी कोरलेली असेल, तर दुसऱ्या बाजूला विजेत्या संघाची ओळख असेल. सामना संपल्यानंतर विजेत्या संघाच्या कर्णधाराला आणि मुख्य प्रशिक्षकाला तात्पुरती अंगठी दिली जाईल. मात्र, नंतर तीस अंगठ्या मापानुसार तयार करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता हा संस्मरणीय ठेवा स्पेनचा संघ की अर्जेटिना पटकावणार, याबाबत औत्सुक्य आहे. FIFA World Cup 2026 : फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरसाठी आज इंग्लंड-फ्रान्समध्ये लढत, 279 कोटीचं बक्षीस कोण जिंकणार? फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना स्पेन जिंकणार की अर्जेटिना याची क्रीडा जगतात चर्चा सुरू आहे; पण या सामन्यावर गडद धुराचे सावट आहे. ही लढत होणाऱ्या न्यूयॉर्क आणि परिसरावर गडद धुराचे सावट पसरले आहे. या परिस्थितीत शनिवारी पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे अंतिम सामन्यापूर्वी वातावरण स्वच्छ होईल, अशी आशा आहे.
कॅनडातील वणव्यामुळे अमेरिकेत धूर
कॅनडातील वणव्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांत धूर पसरला आहे. दृष्यमानता कमी झाली आहे. हवेचा दर्जा खालावला आहे. स्थानिकांना घराबाहेर शक्यतो पडू नको; तसेच काहीही त्रास झाल्यास तातडीने उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर गुरुवारी येथे होणारा अमेरिकेतील लीगमधील फुटबॉल सामना लांबणीवर टाकण्यात आला होता. Cristiano Ronaldo : वर्ल्डकपमधून पोर्तुगाल बाहेर, रोनाल्डोचं स्वप्न अधुरं, शेवटच्या 1 मिनिटात गेम पालटला वर्ल्ड कप अंतिम सामन्यासाठी स्पेनचा संघ बुधवारीच न्यूयॉर्कला दाखल झाला आहे. त्यांनी गुरुवारी प्रतिकूल वातावरणात सराव केला. हा सराव एक तास झाल्याचीच माहिती देण्यात आली. त्यातील सुरुवातीची १५ मिनिटे माध्यमांना प्रवेश होता. मात्र, त्या वेळी प्रामुख्याने हलका व्यायामच करण्यात आला. त्यामुळे संघाने कशा स्वरूपाचा; तसेच नेहमीप्रमाणे पूर्ण जोषात सराव केला की हलका हे समजू शकले नाही. स्पेन संघटनेने त्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. अर्जेटिना संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवशी अॅटलांटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा संघ न्यूयॉर्कला स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी येण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा