Most Expensive Divorces: अब्जाधीश व्यक्तींच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचालींकडे, विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास लोकांना खूप रस असतो. सेलिब्रिटी, अब्जाधीशांमध्ये घटस्फोट एक सामान्य बाब बनली असून कोणी 40 वर्षांनी घटस्फोट घेतला, तर कुणी 15-20 वर्षांनी एकमेकांपासून विभक्त झाले.

जगातील महागडा घटस्फोट कोणाचा?
बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यात जगातील सर्वात महागडा घटस्फोट अग्रीमेंट झाला. गेट्स दाम्पत्य लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनंतर 2021 मध्ये झाला असून बिल गेट्स यांनी पत्नीला तब्बल अंदाजे 76 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 6.3 लाख कोटी रुपयांची पोटगी दिली.
जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट
गेल्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेले ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस 2019 मध्ये पहिली पत्नी मॅकेन्झी बेझोस यांचा घटस्फोट झाला. जेफ बेझोस यांना घटस्फोटात एक्स-पत्नीला पोटगी म्हणून 2.75 लाख कोटी रुपये द्यावे लागलेले. यानंतर मॅकेन्झी जगातील 22 व्या सर्वात श्रीमंत बनलेल्या. लग्नाच्या 25 वर्षांनी 2019 स्कॉट आणि जेफ बेझोस विभक्त झाले. या घटस्फोटाची जगभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली.
रूपर्ट आणि ॲना मर्डोक
अमेरिकेतील मीडिया क्षेत्रातील दिग्गज रूपर्ट मर्डोक आणि त्यांची दुसरी पत्नी ॲना मर्डोक यांचा घटस्फोट अंदाजे 1.7 अब्ज डॉलर्स आणि सुमारे 110 दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेच्या पोटगीसह पूर्ण झाला.
हार्वे विन्स्टिनचा घटस्फोट
हॉलीवूडचा चित्रपट सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्वे विन्स्टिनचा घटस्फोट चर्चेत राहिला. 2017 मध्ये अभिनेत्री आणि महिला कलाकारांनी मीडिया सम्राटावर लैंगिक छळाचे आरोप केले, ज्यामुळे #MeToo चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर फॅशन डिझायनर जॉर्जिया चॅपमनने हार्वे विन्स्टिनपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अंदाजे 15-20 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 1.64 अब्ज रुपयांपेक्षा जास्त सेटलमेंटमध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
अलेक वाइल्डनस्टाईन आणि जॉसेलिन वाइल्डनस्टाईन
1999 मध्ये फ्रेंच-अमेरिकन व्यावसायिक आणि कला व्यापारी ॲलेकने दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आपल्या पत्नीला 3.8 अब्ज डॉलर्सची पोटगी दिली.
भारतातील सर्वात महागडा घटस्फोट (संभाव्य)
भारतीय श्रीमंतांबद्दल बोलायचे तर Zoho चे सह-संस्थापक श्रीधर वेंबू आणि प्रमिला श्रीनिवास यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. याआधी कॅलिफोर्निया कोर्टाने त्यांना पत्नी प्रमिलाला 15000 कोटींचा बॉन्ड जमा करण्याचा आदेश दिला होता. पण अंतिम निकाल असाच लागला, तर श्रीधर वेंबूंचा घटस्फोट भारतीय इतिहासातील सर्वात महागडा ठरू शकतो.

