Headlines

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरसाठी आज इंग्लंड-फ्रान्समध्ये लढत, 279 कोटीचं बक्षीस कोण जिंकणार?


FIFA World Cup 2026 England vs France News : फिफा वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल लढतीत पराभूत झालेल्या दोन संघांचा सामना आज तिसऱ्या नंबरसाठी होणार आहे. इंगलं आणि सलग दोनवेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या फ्रान्स आमनेसामने येणार आहेत. तिसऱ्या नंबरसाठी बक्षिसाठी मोठी रक्कम आहे? कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FIFA England vs France
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वर्ल्ड कप फुटबॉलच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर ब्राँझपदकासाठी अर्थात तिसरा क्रमांकासाठी सामना खेळणे ही अनेक संघांना शिक्षाच वाटत असते. फ्रान्स आणि इंग्लंड संघही अपवाद नाहीत. मात्र, किलियन एम्बापेला असलेली ‘गोल्डन बूट’ जिंकण्याची संधी; तसेच मार्गदर्शक दिदिएर देशॅम्प यांच्या सांगता लढतीमुळेच हा सामना फ्रान्ससाठी मोलाचा झाला आहे.

सलग तिसरी अंतिम फेरी खेळण्याचे फ्रान्सचे स्वप्न स्पेनविरुद्धच्या ०-२ पराभवामुळे संपुष्टात आले, तर इंग्लंडला उपांत्य फेरीतील पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. ते अर्जेटिनाविरुद्ध १-२ असे पराभूत झाले. त्यामुळे या दोन संघांवर तिसऱ्या क्रमांकाची लढत खेळण्याची वेळ आली आहे. या सामन्याद्वारे देशॅम्प यांची फ्रान्स मार्गदर्शक म्हणून १४ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येईल. त्या कालावधीत फ्रान्स वर्ल्ड कपचे विजेते आणि उपविजेते झाले. देशॅम्पही या सामन्याच्या वेळी पुरेसे तयार नसतील. ५७ वर्षीय मार्गदर्शकांनी वर्ल्ड कप विजेतेपदाद्वारे निरोप घेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मलमपट्टीही ठरणार नाही.
Maharashtra TimesIND vs ENG 3rd ODI : गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांसोबत बोलत नाहीत? बॅटिंग कोचने सांगितली आतली बातमी
प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्यासाठीच येतो. त्यातही उपांत्य फेरीतील पराभवाच्या यातना जास्त असतात. आपण ज्यांच्यांविरुद्ध हरलो, त्यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असताना आपण खेळायचे. त्यातही दीर्घ स्पर्धेने शारीरीकपेक्षा मानसिक थकवा जास्त आलेला असतो. उपांत्य फेरीतील पराभवाने संघ जवळपास उद्ध्वस्त झालेला असतो. त्यामुळेच या सामन्यासाठी मन पूर्णपणे तयार नसते. आमच्या संघातीलच नव्हे तर फ्रान्स संघातील कोणीही खेळाडू हा सामना खेळण्यास तयार नसेल. प्रत्येकाची अंतिम लढत खेळण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्व काही दिले होते, इंग्लंडचे मार्गदर्शक थॉमस टशेल यांनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या भावनांना शब्दात मांडले.
Maharashtra TimesRohit Sharma : हुश्श! लॉर्ड्सवर रोहितचा अखेरचा वनडे सामना नसेल, BCCI ने चर्चा फेटाळल्या, वर्ल्डकपमधील सहभागावर काय म्हणाले?
या सामन्यांत प्रतिस्पर्धी संघ आपल्या प्रमुख खेळाडूंना संघाबाहेरच ठेवण्याची शक्यता आहे. यास अपवाद एम्बापेचा असेल. एम्बापेने यंदाच्या स्पर्धेत आठ गोल केले आहेत. त्याचे या स्पर्धेतील एकूण गोल वीस आहेत. त्यामुळे त्याला स्पर्धेतील गोल्डन बूट पुरस्कार जिंकण्याची संधी आहे, त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रमही त्याला खुणावत आहे. प्रतिस्पर्धी संघातील नवोदित आगामी युरो कप तसेच युरो नेशन्स लीग स्पर्धेसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यास आतूर असतील. त्यानंतरही फारसे नाट्य या लढतीत नसण्याची शक्यता आहे.

२० लाख डॉलरसाठी

  • या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या संघास दोन कोटी ९० लाख डॉलर मिळतील, तर चौथ्या क्रमांकाच्या संघास दोन कोटी ७० लाख डॉलर
  • १९३० आणि १९५०च्या स्पर्धेत तिसऱ्या
  • क्रमांकाची लढत नव्हती
  • जस्ट फाऊंटन (फ्रान्स, १९५८)) यांनी याच सामन्यांत पश्चिम जर्मनीविरुद्ध चार गोल केले होते. त्यामुळेत्यांचे एका स्पर्धेत १३ गोल. हा विक्रम अजून अबाधित
  • हाकान सुकुर (तुर्किए) यांचा २००२च्या स्पर्धेतील दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यांत ११व्या सेकंदास गोल. हा अजूनही वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान गोलचा विक्रम
  • सर्वाधिक चारवेळा जर्मनीचा तिसरा क्रमांक पाच सामन्यांत ही कामगिरी. ब्राझील, पोलंड, क्रोएशिया आणि फ्रान्स प्रत्येकी दोनदा तिसऱ्या क्रमांकावर
  • फ्रान्सची ही तिसऱ्या क्रमांकाची चौथी लढत. यापूर्वीच्या तीन सामन्यांत दोन विजय. १९८६ नंतर प्रथमच अंतिम लढत खेळणार

हे महत्त्वाचे

  • अवे संघ म्हणून खेळताना इंग्लंडचा गेल्या दहा सामन्यांत विजय (उपांत्य लढतीच्यावेळी होम संघ)
  • किलियन एम्बापेने गोल केलेल्या गेल्या आठ सामन्यांत फ्रान्सचा विजय
  • एम्बापेने या स्पर्धेतील पाच सामन्यांत पहिला गोल केला.
  • फ्रान्सने यंदाच्या स्पर्धेत दोन्ही अर्थात प्रतिस्पध्यांपेक्षा जास्त गोल सातपैकी तीन सामन्यांत केले
  • फ्रान्सचे यंदाच्या ११ पैकी ९ लढतीत विजय, दोन पराभव.
  • फ्रान्सच्या गेल्या १६पैकी १३ विजय दोन गोलच्या फरकाने.
  • यंदाच्या स्पर्धेत प्रीमियर लीग खेळणाऱ्या खेळाडूने इंग्लंडसाठी एकच गोल केला, तो म्हणजे अँथनी गॉर्डन. तोही प्रीमियर लीगचा निरोप घेण्याच्या तयारीत. बार्सिलोनाकडे जाण्याची शक्यता
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा