Akola Latest News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या या विहिरीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याच्या नादात एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. आता पर्यंत चायना मांजाने जीव गेल्याच्या घटना आपण पहिल्या, आणि आता पतंग उडवत असताना 10 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शेख उबेर ऊर्फ उमर शेख फकीरा असं मृत चिमुकल्याचं नाव आहे.
मूर्तीजापुर येथील जुनी वस्ती, पोळा चौक परिसरातील प्रजापती ले आउट समोर असलेल्या एका शेतात चिमुकला पतंग उडवत होता. शेतातच एक उघडी आणि पडकी विहीर होती. पतंग उडवताना भान न राहिल्याने चिमुकला उबेर उघड्या आणि पडक्या विहिरीत पडला, उबेर विहिरीत पडल्याची वार्ता गावात पसरताच संपूर्ण गाव विहिरीजवळ दाखल झाला. मात्र विहिरीत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. Akola News: मतदानावेळी अकोल्यात मोठा राडा; शिवसेना-भाजप उमेदवार भिडले, केंद्राबाहेरच एकमेकांवर धावून गेले, कारण काय? मूर्तिजापूर शहरातील पोळा चौकाजवळील ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत उघडी होती. यापूर्वीही या विहिरीत जनावरे पडून नुकसान झाले होते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी उमर खेळत असताना पाय घसरून उघड्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून पिंजर संत गाडगेबाबा बचाव आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत उतरून बालकाचा मृतदेह बाहेर काढला. जिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार? उमर हा पाच बहिणींमधील एकमेव भाऊ होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उघडी व असुरक्षित विहीर मृत्यूकडे निमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा