Buldhana Hacking Woman Mobile and Threatening to Phyisical Relations Accused Absconding after Phone; आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी
Buldhana Hacking Woman Mobile and Threatening to Phyisical Relations Accused Absconding after Phone; आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी
Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बुलढाण्याच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार आहे.
महिलेचा मोबाईल हॅक शारीरिक संबंधाची मागणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीने एका पीडित महिलेला चक्क विवस्त्र होण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे. 35 वर्षीय महिलेला सुरुवातीला मोबाईल हॅक करून त्यातील संपूर्ण डेटा चोरला. त्यानंतर आरोपी इथेच न थांबता त्याने पीडिते महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ब्लॅकमेल सुरू केल्यानंतर तिला विवस्त्र होण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील सोनाळा पोलीस यांनी ऋषिकेश गिरी (वय 27) नावाच्या आरोपीवर विविध कलमाने गुन्हा दाखल केला असून. तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपीला अटक करण्याच्याकरिता पोलीस कामाला लागली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याने पीडित महिलेचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅक करून त्यातील व्हाट्सअप चॅट गॅलरीमधील खासगी डेटा, ई-मेल, व्हिडिओ आणि फोटो यावर ताबा मिळवत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्या पतीला व नातेवाईकांना ते व्हिडिओ आणि फोटो पाठवून तिला बदनाम करेल अशी धमकी देत तिचा छळ सुरू केला. हा सर्व प्रकार इथेच थांबला नाही. तर व्हिडिओ कॉलवर तिला विवस्त्र होण्यास सक्ती केली. त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्या आरोपीने पीडितेच्या बहिणीला देखील पाठवले व त्यानंतर ‘तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुला ठार मारेल’, अशी जीव मारण्याची धमकी देखील दिली. Satara Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर विवाहितेवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार, व्हिडिओही काढला; साताऱ्यातील घटना उघड
या सर्व प्रकारानंतर या छळाला कंटाळून पीडित महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात तोंडी दिलेल्या तक्रारीवरून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर ओळखून कारवाई करत तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी ऋषिकेश गिरी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकंदरीत सायबर सुरक्षाबाबत वेळोवेळी जनजागृती करत लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केल्यानंतर देखील अशा मोठ्या घटना घडत आहेत. याला निश्चितच कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा