प्रसाद रानडे, नवी मुंबई : एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात कारवायांचा धडाका लावला आहे. अशीच एक मोठी कारवाई नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात करण्यात आली आहे. दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट पकडण्यात आलं आहे. या प्रकरणी तब्बल 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला. भेसळीची धक्कादायक पद्धत आणि रंगेहाथ कारवाई छाप्यादरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात ‘एमएच ०४ केयू १६३४’ क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले.
डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहाथ पकडला गेला.
१५ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (FIR क्र. ४३५/२०२६) दाखल करण्यात आला असून संबंधित पेढ्यांचे अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या गुन्ह्यामध्ये शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल, प्रदीप कमलेश यादव, भास्कर संतु पिलानी यांच्यासह मे. महाराज डेअरी (ऐरोली), मे. विजय डेअरी (घणसोली), मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली), मे. रूपसागर डेअरी (ऐरोली), मे. दिनेश डेअरी (ऐरोली), मे. बालाजी डेअरी (ऐरोली), मे. शुक्लम् डेअरी (दिघा), मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे), मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे), मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे), मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे) आणि मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे) या १५ व्यक्ती व पेढ्यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
आरोपी दुधात भेसळ नेमकं कशी करायचे?
१ किलो स्किम मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लीटर थंड पाणी मिसळून ते प्लंजरच्या साहाय्याने एकजीव केले जात होते. हे भेसळयुक्त दूध गायी-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवले जात होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट
अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान विविध डेअऱ्यांमधून एकूण ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध (किंमत ₹१,८५,७८०) जप्त करून सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आले. याशिवाय १२९.५ किलो पनीर (किंमत ₹४५,२८०), ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (किंमत ₹१,६०,८२०) आणि ८८.४ किलो क्रीम (किंमत ₹३०,९४०) असा एकूण लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
म्हशीचे आणि गायीचे दूध नष्ट
तपासणीदरम्यान मे. पी. के. डेअरीतून ३९३ लिटर म्हशीचे आणि ३६८ लिटर गायीचे असे एकूण ७६१ लिटर दूध (किंमत ₹४०,५५८/-) जागेवरच नष्ट केले गेले. पुरवठादार मे. भास्कर डेअरी (महापे) येथून ५४८ किलो संशयित पावडर व पनीर (किंमत ₹१,८३,३२०) जप्त करून परवाना निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मे. नारायण डेअरी (रबाळे) कडील प्रयोगशाळा अहवाल नसलेला ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दुधाचा साठा (किंमत ₹१,२४,०३२/-) नष्ट करण्यात आला, तर मे. फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाकडून ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले.
ही कारवाई कोकण विभागाचे सह-आयुक्त (अन्न) अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम, प्रशांत पवार, उत्तरेश्वर बडे, माणिक जाधव व गुप्तवार्ता पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थात भेसळीचा संशय आल्यास प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सह-आयुक्त डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा