Headlines

नवी मुंबईकरांना वाहतूककोंडीतून दिलासा, कोपरखैरणेतील ‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण; कसा असेल मार्ग?| Maharashtra Times


Koparkhairane Connecting Link: नवी मुंबईत कोपरखैराणे येथील सेक्टर ११ ला पवनेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याशी जोडणाऱ्या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामुळे एपीएमसी मार्केट आणि तुर्भे येथे थेट मार्ग उपलब्ध झाला आहे.

कोपरखैरणेतील 'कनेक्टिंग लिंक'चे लोकार्पण
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पावणे पूल ते सेक्टर-११ जोडणाऱ्या ‘कनेक्टिंग लिंक ब्रिज’चे लोकार्पण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे कोपरखैरणे सेक्टर-११, खैरणे गाव आणि बोनकोडे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सुलभ होणार आहे. तसेच वाशी-कोपरखैरणे मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

कसा असेल मार्ग?

या नव्या पुलामुळे कोपरखैरणे परिसरातून तुर्भे एपीएमसी मार्केटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच तुर्भे एपीएमसी आणि सानपाडा परिसरातून कोपरखैरणे तसेच ठाणे-बेलापूर मार्गाकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनाही या पुलाचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच वाहतुकीवरील ताणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Road: तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार

वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता नागरिकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त वाहतूक व्यवस्था उभारणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले. सभागृहनेते सागर नाईक आणि स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाल्याचे नाईक यांनी नमूद केले. लोकार्पण सोहळ्यास उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, नगरसेविका वैष्णवी नाईक, अदिती नाईक, नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अजय संख्ये, महापालिका अधिकार उपस्थित होते. कोपरखैरणे आणि बोनकोडे येथून एपीएमसी मार्केट आणि तुर्भेपर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता बांधण्याची सिडकोची योजना नव्हती अशी मंत्री नाईक यांनी माहिती दिली. पण या नव्या पुलामुळे नागरिकांना लांबचा रस्ता घेण्याची गरज पडणार नाही यासाठी त्यांनी समाधान व्यक्त केलं.

पुलाचे वैशिष्ट्ये काय?

हा नवा पूल ४१ मीटर लांब आणि ७.५० मीटर रुंद आहे. पवनेश्वर उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि सेक्टर ११ कोपरखैराणे रस्ता यांच्या दरम्यान असलेल्या एका मोठ्या नाल्यावर हा पूल बांधण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे एपीएमसी मार्केटकडे प्रवास करणाऱ्या कोपरखैरणे सेक्टर ११ गाव आणि बोनकोडे गावातील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, तुर्भे एपीएमसी, सानपाडा आणि कोपरखैरणे या भागांमध्ये ये-जा करणं सुलभ होणार आहे.

Maharashtra TimesKurla Junction: पाऊस पडताच कुर्ला जंक्शन पाण्याखाली, पुरमुक्तीसाठी हालचाली सुरू; महापालिकेकडून १३ कोटींच्या कामांचा प्रस्ताव

दरम्यान, ठाणे-बेलापूर मार्गाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाशी-कोपरखैराणे मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. तसेच, नवी मुंबईच्या निवासी आणि व्यावसायिक भागांदरम्यान वाहनचालकांना एक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल ज्यामुळे वाहतुकीचे अधिक कार्यक्षमतेने वितरण होण्यास आणि मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल असे महापालिकेचे मत आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा