Headlines

Navi Mumbai Madhuri Jaiswal Brain Dead Father takes Organ Donation Decision; माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले, डॉक्टरांचे प्रयत्नही व्यर्थ; कठोर अंतःकरणाने वडिलांचा मोठा निर्णय


Navi Mumbai News : रुग्णालयात आणले त्यावेळी माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते, मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून ३० मिनिटांच्या सीपीआरनंतर तिचे रक्ताभिसरण पुन्हा सुरू केले.

Navi Mumbai Organ Donation Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आपल्या तरुण मुलीच्या अचानक जाण्याने कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारुन, एका पित्याने आणि त्यांच्या परिवाराने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गंभीर अवस्थेतील तीन रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. डॉक्टरांनी मृत तरुणीचे हृदय, यकृत (लिव्हर) आणि दोन्ही किडन्या यशस्वीरित्या काढून गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी दिल्या आहेत.

वाशी गावातील रहिवासी विजय जैस्वाल (५०) हे साई जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान चालवतात. जैस्वाल यांची २२ वर्षीय मुलगी माधुरीने १३ जुलै रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेतला होता.

माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला तातडीने खाली उतरवून कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आणि वाशी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात आणले त्यावेळी माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून ३० मिनिटांच्या सीपीआरनंतर तिचे रक्ताभिसरण पुन्हा सुरू केले.
Maharashtra TimesBengaluru Triple Murder : प्रियकर-प्रेयसीने आई-वडील, धाकट्या बहिणीचा जीव घेतला, AI चॅटबॉटचा सल्ला, दागिने-रोकड घेऊन पळाले
तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूला मोठी सूज आली होती. अखेर १४ जुलै रोजी डॉक्टरांनी तिची प्रकृती तपासून ती ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याचे घोषित केले. मात्र तिचे शरीर (हृदय व इतर अवयव) व्हेंटिलेटरच्या साहाय्याने जिवंत होते.

मेंदूमृत तरुणीच्या अवयवदानाचा निर्णय

मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच, एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने जैस्वाल कुटुंबियांना अवयवदानाचा पर्याय समजावून सांगितला. आपली मुलगी वाचू शकली नाही, तरी तिच्या अवयवांच्या रूपाने इतरांना जीवन मिळावे, हा उदात्त विचार करून वडील विजय जैस्वाल आणि कुटुंबियांनी अवयवदानाला तात्काळ होकार दिला.

Anish Gawande | ‘हे सरकार अफझल खानाचं आहे,पाठीत खंजीर खुपसतं’

१६ जुलै रोजी सर्व आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून माधुरीला मृत घोषित करण्यात आले आणि १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करून तिचे अवयव काढण्यात आले.
Maharashtra TimesCrime News : तुषारss तुषारss… नवऱ्याला संपवलं, बायको रात्रभर तुरुंगात तळमळत, ओठात बॉयफ्रेण्डचंच नाव, विचित्र मागणी ऐकून पोलीसही चक्रावले

अवयवदानानंतर बॉडी कुटुंबाकडे

माधुरी हिचे हृदय, यकृत (लिव्हर) आणि दोन्ही किडन्या प्रत्यारोपणासाठी सुरक्षितपणे संकलित करण्यात आल्या. अवयवदानाची ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर, बॉडी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आली. या दुःखद घटनेबाबत कुटुंबियांची कोणाविरुद्धही तक्रार किंवा संशय नसल्याचे वाशी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.