Headlines

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर, हमीद दाभोलकर यांची पहिली प्रतिक्रिया


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीलाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर डॉ. हमीद दाभोलकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

hamid dabholkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात मॉर्निंग वॉक करताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला उद्या (गुरूवारी) १३ वर्षे पूर्ण होत आहेत. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर झाला होता तर दाभोलकर हत्येला १३ वर्षे पूर्ण होण्याच्या दोन दिवस आधी सचिन अंदुरेलाही जामीन मंजूर झाला आहे. या घटनेवर डॉ. हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करताना त्यांची जन्मठेपेची शिक्षा देखील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात डॉ. हमीद दाभोलकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जे विचार थांबविण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. ते विचार गेल्या १३ वर्षांत अजिबात थांबलेले नाहीत.

डॉ. दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या झाली होती. त्या घटनेला गुरूवारी १३ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशातील १२ ते १५ राज्यांमध्ये त्यांच्या विचारांचा जागर केला जाईल. हेच त्या मारेकऱ्यांना आणि विचारधारेला उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. हमीद दाभोलकरांनी दिली आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत झाला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने १० मे २०२४ रोजी मुख्य आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने त्यांना प्रत्यक्ष गोळ्या झाडणारे मारेकरी मानले होते, तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीन संशयितांची पुराव्याभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

Maharashtra TimesShiv Sena Hearing : धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा, कपिल सिब्बल यांची मागणी, सुनावणीत ट्विस्टपुणे सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या फरकाने जामीन मंजूर केला आहे. तसेच जन्मठेपेच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमधील त्रुटी आणि सीबीआयने सादर केलेले पुरावे कमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवत, हायकोर्टाने अपील प्रलंबित असेपर्यंत हा जामीन दिला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा