Headlines

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मातृशोक; सुभद्रा ऐवळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन


सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
​सुभद्रा ऐवळे यांच्या निधनाने ऐवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. सुभद्रा अर्जुन ऐवळे यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना जावई नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत