मुंबई : टीम इंडियाचा एक क्रिकेटर सध्या चर्चेत आला आहे. कारण त्याने आपल्यापेक्षा ७ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमाच आकंठ बुडाला आहे. इंडिया टीम आणि केकेआर टीमचा भाग असलेला क्रिकेटर रमणदीप सिंग याने कैसी ये यारियाँ फेम अभिनेत्री चार्ली चौहान हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. टीम इंडियासाठी करिअरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. दरम्यान, रमणदीपने पारंपरिक शीख रितीरिवाजानुसार एका गुरुद्वारामध्ये अभिनेत्री चार्लीशी लग्न केले आहे. या जोडप्याने आतार्यंत त्यांचे नाते सोशल मीडियापासून दूरच ठेवले होते. विशेष बाब म्हणजे चार्ली चौहान ही रमणदीपपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे.
दरम्यान, चार्ली आणि रमणदीप हे एका गुरुद्वारामध्ये त्यांच्या पंजाबी-शीख या दोन्ही रितीरिवाजाप्रमाणे विधी करताना दिसून आले. चार्ली आण रमणदीपच्या लग्नाच्या लूकनेही यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री चार्ली चौहान हिने यावेळी लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अतिशय खूलले होते. तिने सोन्याचा हार, बांगड्या, कानातले आणि इतरही अनेक आकर्षक असे दागिने परिधान केले होते.
तर रमणदीपने यावेळ पारंपरिक शेरवानी आणि लाल रंगाची पगडी परिधान केली होती. तोही विवाहसोहळ्यामध्ये अतिशय देखणा दिसत होता. या सोहळ्याला केवळ कुंटुंबातील लोक आणि जवळचे काही मित्र उपस्थित होते. हा विवाहसोहळा अतिशय खाजगी पद्धतीने पार पडला. इन्स्टाग्रामवर या जोडप्याचा एक रिल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या रिलमध्ये हे नवं जोडपं नाचताना आणि त्यांच्या खास दिवसाता आनंद घेताना दिसत आहे.
दुसऱ्या एका रिलमध्ये अभिनेत्री चार्ली चौहानच्या हळदी समारंभाचे काही फोटो पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री माही वीज हिनेही या जोडप्याला स्टोरी ठेऊन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. इतरही अनेक सेलिब्रिटींनीही दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावत त्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. रमणदीप आणि चार्ली यांचे प्रेमसंबंध अतिशय गुप्त राहिल्याने त्यांच्या लग्नाबद्दल एकप्रकारे आश्चर्यही व्यक्त केले जाक आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा