Vaibhav Sooryavansi News : भारताचा वंडर बॉय आणि बेबी बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या वैभव सूर्यवंशी याची बॅटिंग आज सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. तुम्हाला माहिती का हा सामना जिथे होणार आहे त्या मैदानावर या पठ्ठ्याने आधीच इतिहास रचलाय, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाव्बे टी-२० मालिकेमधील पहिला टी-२० सामना आज पार पडणार आहे. हा सामना हरारे स्पोर्टस मैदानावर होणार असून वैभवकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. कारण याच मैदानावर वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड कप फायनल सामन्यात तुफानी खेळी केली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. याच खेळीमुळे भारत वर्ल्ड कप फायनल सामना सहजपणे खिशात घातलेला. वैभवच्या या खेळीबद्दल जाणून घ्या.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात वैभवचा समावेश होता. त्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. या वर्ल्ड कपची अंतिम लढत हरारे स्पोर्टस मैदानावर झाली होती. त्यात त्याने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची आक्रमक खेळी केली होती. पण या सामन्याता यजमान झिम्बाव्बे संघाच्या गोलदाजांचे त्याच्यासमोर आव्हान असणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे ते सहजासहजी वैभवला आक्रमण करू देणार नाहीत. मात्र पॉवर प्ले मध्ये तुटून पडणारा वैभव सूर्यवंशी आज कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएल गाजवल्याने १५ वर्षीय वैभवची आयर्लंड, इंग्लंडमधील टी-२० मालिकेसाठी निवड झाली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सचिन तेंडुलकरचा प्रदीर्घ काळ असलेला विक्रम मोडीत काढून तो भारताचा सर्वांत युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. तो एकूण तीन सामने खेळला. मात्र एकाही सामन्यांत तो मोठी खेळी करू शकला नाही. IND vs ZIM 1st T20 Playing 11 : भारत वि. झिम्बाब्वे पहिला टी-20 सामना, प्लेइंग 11 मधील आपल्यापेक्षा झिम्बाब्वेची बॉलिंग अनुभवी; 2 खेळाडू करणार डेब्यू ‘गेल्या चार महिन्यांत अनेक चढ-उतार आले आहेत. अर्थात, हा क्रिकेटचा एक भागच आहे आणि हे घडतच राहील; पण मिळालेल्या संधीचे सोने करणे आणि विजयात १०० टक्के योगदान देणे एवढेच करायचे आहे,’ असे भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने स्पष्ट केले. संघातील सहकाऱ्यांनी सातत्याने मला साथ दिली. त्यामुळे अपयशातून बाहेर पडू शकलो. नव्या आव्हानावर लक्ष केंद्रीत करण्यास तयार झालो. माझा सराव उत्तम सुरू आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असे वैभवने सांगितले. IND vs ZIM T20 Series : भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहायचे? वेळ बदलली, नवीन चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण माझ्यासाठी हे मैदान संस्मरणीय आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी इथे वर्ल्ड कपचा अंतिम सामना जिंकलो होतो. त्यामुळे हे मैदान खूप खास आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हा खूप खास क्षण आहे. ज्या मैदानावर चार महिन्यांपूर्वी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता, त्याच मैदानावर पुन्हा खेळताना एक वेगळीच भावना असेल, असे सांगताना वैभव आठवणीत रमला होता.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा