नागपुरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इसमाने माहेरी गेलेल्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या माहेरी जाऊन पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारडी येथील पुनापूर परिसरातील भवानी मंदिराजवळ हा प्रकार घडला. आरोपी पतीने पत्नीचे केस पकडून तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि माचिसच्या काडीने आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेची आरडाओरड ऐकून तिच्या बहिणीने आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आरोपीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
खुशबू सूरज तिवारी असे जखमी महिलेचे नाव आहे. सूरज प्रभुनाथ तिवारी असे आरोपी पतीचे नाव आहे. खुशबू आणि सूरज यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक लहान बाळ आहे. मात्र, पती कोणतेही काम धंदा करत नसून दारूच्या आहारी गेल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करत होता. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून खुशबू काही दिवसांपासून आपल्या लहान बाळासह माहेरी राहत होती.
आरोपी सासरी गेला
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सूरज पुनापूर येथील पत्नीच्या माहेरी गेला. त्याने खुशबूला आपल्यासोबत घरी चलण्यास सांगितले. मात्र, यावेळी दोघांमध्ये वाद झाला. सूरजने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घराबाहेर गोंधळही घातला.
मात्र, या वादानंतरही सूरज थांबला नाही. त्याने दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास तो पुन्हा दुचाकी घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला. यावेळी त्याने पुन्हा खुशबूसोबत वाद घातला. शिवीगाळ करत तिला धमकी दिल्यानंतर त्याने दुचाकीमधून बाटलीत पेट्रोल काढले आणि तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचिसची काडी पेटवून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खुशबूने मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्या बहिणीने प्रतिकार करत आरोपी सूरजला पकडून घराच्या बाहेर ओढले, आणि तिच्या अंगावर चादर टाकली तिचा आवाज ऐकून आजूबाजूतील लोक नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत आरोपीला रोखले आणि महिलेला आरोपीपासून दूर केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड, घटनेनंतर फरार
घटनेनंतर खुशबूला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, खुशबूने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी सूरज तिवारी विरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पूर्वीही गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेनंतर आरोपी सूरज तिवारी फरार झाला असून पारडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा