Chhatrapati Sambhajinagar News: मोंढा नाका उड्डाणपुलाच्या जवळ सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम झाले होते. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.या खड्ड्यांमुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न येणे , गाड्या खड्ड्यांत आदळणे, आणि दुचाकीस्वार पडत असल्याच्या सतत घडत आहेत. यांमुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त आहेत

वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष
नवीन जलवाहिनीचे काम केल्यानंतर त्याची वेळेतडागडुजी न केल्यामुळेजालना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनही त्याची दुरुस्ती होत नसल्याने या जीवघेण्या खड्ड्यांमुळे शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे.
मोंढा नाका उड्डाणपुलालगत असलेल्या खड्ड्यांमध्ये गाड्या अडकून अनेक अपघात होत असूनही यंत्रणांचे दुर्लक्ष कायम आहे.
असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.
शहरातील प्रमुख रस्ता म्हणून जालना रस्त्याची ओळख आहे. महापालिका हद्दीत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याची मालकी, देखभाल, दुरुस्ती हा विषय कायम चर्चेचा राहिला आहे.रस्त्यावर उभारलेले चार उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत. मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजी करून दिली होती. त्यामुळे काम करताना एक यंत्रणा आणि देखभाल दुरुस्तीला प्रत्येकाने एकमेकांकडे बोट दाखविणे असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.
ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले
दरम्यान, शहराच्या नवीन पाणी योजनेचे पाइप टाकण्यासाठी मागच्या वर्षी जालना रस्त्यावरील उत्तरेकडची बाजू दुधडेअरी चौकापासून खोदण्यात आली. हे काम टप्पेनिहाय कितीतरी महिने चालले. काम संपल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते, पण त्यावर थातूरमातूर ठिगळपट्टी केली गेली. मातीचा भराव टाकला गेला. पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्ड्याती माती वाहून गेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
रोज अपघात होत आहेत.
पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने दुध डेअरीलगत पाण्याचे तळे गेल्या महिनाभरापासून साचलेले आहे.क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूलगत रस्ता व साइडपट्टीतील माती वाहून गेल्याने तिथेही पाणी साचून राहत असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात होत आहेत.

