Headlines

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त;जीवनवीहिनी असलेल्या जालना रोडवर वाहने चालविणे धोक्याचे, उपाययोजनांची मागणी


Chhatrapati Sambhajinagar News: मोंढा नाका उड्डाणपुलाच्या जवळ सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम झाले होते. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.या खड्ड्यांमुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न येणे , गाड्या खड्ड्यांत आदळणे, आणि दुचाकीस्वार पडत असल्याच्या सतत घडत आहेत. यांमुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त आहेत

खड्डे
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:मोंढा नाका उड्डाणपुलाच्या उत्तरबाजूला सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम झाले होते. कंडी टॉवरपासून मोंढा नाका उड्डाणपुलाखालील चौकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अमरप्रीत चौकातून वेगाने येणाऱ्या गाड्यांना अंदाज येत नाही. आणि खड्ड्यात आदळून दररोज मोठ्या गाड्यांचे अपघात होत आहेत. दुचाकीस्वार पडत असल्याच्या घटना नित्याच्याच झाल्याचे परिसरातील रहिवासी सांगतात. एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याकडे नेमके कधी व कोण लक्ष देणार, हा प्रश्न आहे.

वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष

नवीन जलवाहिनीचे काम केल्यानंतर त्याची वेळेतडागडुजी न केल्यामुळेजालना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनही त्याची दुरुस्ती होत नसल्याने या जीवघेण्या खड्ड्यांमुळे शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे.
मोंढा नाका उड्डाणपुलालगत असलेल्या खड्ड्यांमध्ये गाड्या अडकून अनेक अपघात होत असूनही यंत्रणांचे दुर्लक्ष कायम आहे.

असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.

शहरातील प्रमुख रस्ता म्हणून जालना रस्त्याची ओळख आहे. महापालिका हद्दीत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याची मालकी, देखभाल, दुरुस्ती हा विषय कायम चर्चेचा राहिला आहे.रस्त्यावर उभारलेले चार उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत. मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजी करून दिली होती. त्यामुळे काम करताना एक यंत्रणा आणि देखभाल दुरुस्तीला प्रत्येकाने एकमेकांकडे बोट दाखविणे असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.

Maharashtra TimesWeather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले

दरम्यान, शहराच्या नवीन पाणी योजनेचे पाइप टाकण्यासाठी मागच्या वर्षी जालना रस्त्यावरील उत्तरेकडची बाजू दुधडेअरी चौकापासून खोदण्यात आली. हे काम टप्पेनिहाय कितीतरी महिने चालले. काम संपल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते, पण त्यावर थातूरमातूर ठिगळपट्टी केली गेली. मातीचा भराव टाकला गेला. पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्ड्याती माती वाहून गेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Maharashtra TimesPune News : धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला

रोज अपघात होत आहेत.

पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने दुध डेअरीलगत पाण्याचे तळे गेल्या महिनाभरापासून साचलेले आहे.क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूलगत रस्ता व साइडपट्टीतील माती वाहून गेल्याने तिथेही पाणी साचून राहत असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात होत आहेत.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा