कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, मनोज जरांगे नाराज, उदय सामंत मार्ग काढणार? – maratha quota uday samant to discuss manoj jarange s demands about kunbi certificates
कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, मनोज जरांगे नाराज, उदय सामंत मार्ग काढणार? – maratha quota uday samant to discuss manoj jarange s demands about kunbi certificates
मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही कुणबी जात पडताळणी आणि प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विखे पाटील यांच्याशी चर्चा करेन, वेळ पडली तर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून योग्य मार्ग काढू, असा शब्द सामंत यांनी दिला.