Headlines

काय ते अ‍ॅनिमेशन, काय ते डायलॉग्ज, अतिशय वाईट सिनेमा म्हणून सोशल मीडियावर ट्रोल; माय-लेकाच्या या सिनेमानं केली बक्कळ कमाई


सिनेइंडस्ट्री कोणतीही असतो, चांगल्या सिनेमांची जितकी चर्चा होते त्याहून जास्त वाईट सिनेमे चर्चेत येतात. एखादा सिनेमा किती वाईट आहे, याबद्दल जास्तीत जास्त बोललं जातं. पण असाच एक ‘वाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. हा सिनेमा हिंदी, मराठी किंवा हॉलिवूडचाही नाहीये. तर हा एका चीनी भाषेतला सिनेमा. चीनमध्ये प्रदर्शित झालेला ‘ नियू लाई ’ नावाचा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आलाय.

कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही, कोट्यवधींचे बजेट नाही आणि अगदी अत्याधुनिक अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानही नाही. तरीही एका अत्यंत साध्या आणि दिसायला अत्यंत विचित्र अ‍ॅनिमेशन चित्रपटानं संपूर्ण चीनच्या बॉक्स ऑफिसला हादरवून सोडलं आहे. ‘नियू लाई’ (Niu Lai) नावाचा हा चित्रपट सध्या चिनी सोशल मीडियावर आणि चित्रपटगृहांमध्ये तुफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला इंटरनेटवर अतिशय खराब दर्जाचे अ‍ॅनिमेशन म्हणून उडवली गेलेली खिल्लीच या चित्रपटाच्या अनपेक्षित यशाचं मुख्य कारण ठरताना दिसत आहे.

आई आणि मुलाचा ५ वर्षांचा संघर्ष

तर ‘नियू लाई’ या चित्रपटाची निर्मिती एका मोठ्या स्टुडिओनं केली नसून, झिन युमेंग (Xin Yumeng) आणि त्यांची ६० वर्षीय आई सुनि लीफांग (Sun Lifang) या दोघांनी मिळून केली आहे. एका जुन्या संगणकावर तब्बल ५ वर्षे मेहनत करून त्यांनी हा ८६ मिनिटांचा चित्रपट तयार केला.

सर्व भूमिकाचं स्वतःच: लेखन केलं, दिग्दर्शन, अ‍ॅनिमेशन आणि पात्रांना आवाज देण्याचं कामही या आई-मुलाच्या जोडीनंच केले. हा चित्रपट एका लहान वासराच्या आणि एका पक्ष्याच्या काल्पनिक प्रवासावर आधारित आहे.

पहिल्या १० दिवसांत कमावला मोठा गल्ला

तर हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचा कोणताही ट्रेलर किंवा जाहिरात करण्यात आली नव्हती. पहिल्या १० दिवसांत चित्रपटानं देशभरात अवघे ३०० च्या आसपास तिकीट विकली आणि ७,७०० युआन (सुमारे ९०,००० रुपये) ची कमाई केली होती. हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप मानला जात होता.

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

सोशल मीडियावरील ट्रोलिंगनं बदलला बॉक्स ऑफिसवरचा गेम

तर सोशल मीडियावर या चित्रपटातील पात्रांचे अत्यंत कच्चे, त्रुटीयुक्त आणि एडिट न केलेला ३डी व्हिज्युअल्स व्हायरल झाले. लोकांनी याला “आजवरचा सर्वात वाईट अ‍ॅनिमेशन चित्रपट” म्हणत मीम्स बनवण्यास सुरुवात केली. “हा चित्रपट नक्की किती वाईट आहे?” हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. नकारात्मक प्रसिद्धीच या चित्रपटाची सर्वात मोठी जाहिरात ठरली.

“हा चित्रपट पाहिला तर कदाचित ८० मिनिटे पश्चात्ताप होईल, पण नाही पाहिला तर आयुष्यभर पश्चात्ताप होईल!” अशा पोस्ट चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

कोट्यवधींची कमाई आणि तुफान प्रतिसाद

ट्रोलिंगमुळे सुरू झालेली ही लाट थेट बॉक्स ऑफिस यशात बदलल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईनं २.८ कोटी युआन (सुमारे ३३ कोटी रुपये) चा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या मागणीमुळे चित्रपटगृहांनीही आता शो वाढवल्याचं म्हटलं जात आहे.

तर काही ठिकाणी पोस्टर्स नसल्यानं कर्मचाऱ्यांनी स्वतः हातानं काढलेली पोस्टर्स लावली, ज्यावर लिहिले होतं की, काहीतरी वेगळं/विचित्र पाहायचं असेल तर नक्की या, पण तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत! त्यामुळं या हटके सिनेमाची आता जगभरात चर्चा सुरू आहे.