Headlines

आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला आता विरोधी पक्षांकडून‎ सकारात्मक विचारांचीही अपेक्षा‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या आठवड्यात दिल्लीत ‘रचनात्मक काँग्रेस”च्या‎एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी‎यांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य केले. दौऱ्यांदरम्यान परदेशी‎नेत्यांना मिठी मारण्याच्या त्यांच्या सवयीची त्यांनी टर‎उडवली. तिथे उपस्थित तरुण प्रेक्षक या टवाळीवर‎हसले खरे, पण काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी यात‎इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नाव‎ओढल्याने ही बाब अधिकच आक्षेपार्ह ठरली. विरोधी‎पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी टवाळी करण्याच्या या‎धोरणावर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली‎आहे. अशा प्रकारच्या उपहासातून व्यासपीठावर टाळ्या‎मिळतील आणि हेडलाईन्सही बनतील. मात्र, सरकारचे ‎‎परराष्ट्र धोरण समजून घेऊन त्यावर केलेली योग्य टीका ‎‎आणि यात फरक असतो.‎ जनता विरोधी पक्षनेत्याकडून नेहमीच काहीतरी ठोस ‎‎विचारांची अपेक्षा करते. निवडणुकीत योग्य पर्याय ‎‎निवडण्यापूर्वी जनतेला विचार करायला जागा हवी‎असते. संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्षनेता हा‎सत्ताधाऱ्यांवर टीका तर करतोच, पण सोबतच‎धोरणांचा एक सक्षम पर्यायही देशासमोर ठेवतो. गेल्या‎12 वर्षांत राहुल गांधी यांची ‘पप्पू” अशी प्रतिमा तयार ‎‎करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला. त्यामुळेच राहुल गांधी‎आता पंतप्रधानांच्या प्रतिमेला छेद देण्यासाठी त्याच‎तीव्रतेने पलटवार करत आहेत. पण यामुळे देशातील‎राजकीय चर्चेचा स्तर मात्र दुर्दैवाने घसरला आहे.‎काळासोबत राजकारण बदलते आणि ते बदललेही‎पाहिजे. राहुल गांधी यांनी 2022 मध्ये 145 दिवसांची‎‘भारत जोडो यात्रा” काढली होती. या यात्रेच्या‎माध्यमातून त्यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न‎केला. दक्षिणेतील कन्याकुमारीपासून उत्तरेतील‎श्रीनगरपर्यंत ही यात्रा 4,000 किलोमीटरहून अधिक‎चालली. त्यावेळी त्यांचा निश्चय, मेहनत आणि‎सर्वसामान्यांशी साधलेला संवाद यामुळे भाजप‎बॅकफूटवर गेला होता. 2024 च्या सार्वत्रिक‎निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. काँग्रेसने‎लोकसभेतील आपल्या जागा 99 पर्यंत वाढवल्या.‎एवढेच नाही तर भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखले.‎त्यामुळे भाजपला आघाडी सरकार स्थापन करणे भाग‎पडले. अलीकडेच देशभरात तरुणांनी उभारलेल्या‎आंदोलनांनंतर राजकारणातील समीकरणे बदलण्याची‎शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांना या‎आंदोलनातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा फायदा घ्यायचा‎असेल, तर त्यांना आपली प्रतिमा पुन्हा एकदा बदलावी‎लागेल. त्यांची ‘पप्पू” ही प्रतिमा आता पुसली गेली आहे.‎पण आता राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणत्या‎विचारांच्या आणि धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हे‎स्पष्टपणे सांगायला हवे. भविष्यात काँग्रेसचे किंवा‎काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार आल्यास‎देशवासीयांसाठी त्याचा काय अर्थ असेल, हे त्यांनी‎मांडले पाहिजे. विशेषतः तरुण मतदारांसाठी ही बाब‎अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 12 वर्षांपासून निर्माण‎झालेली शांततेची भिंत या तरुणांनी पाडली आहे.‎लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत.‎अशा वेळी काँग्रेसला आपल्या विजयाची शक्यता‎वाढवायची असेल, तर राहुल गांधी यांना सरकारला‎सतत खाली खेचणारे नकारात्मक राजकारण सोडावे‎ लागेल. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवणाऱ्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎व्यक्तीकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा असते. आपण‎राहुल गांधी यांना ‘अँग्री यंग मॅन”च्या रूपात पाहिले‎आहे. रस्त्यावर उतरून लढा देणारा नेता म्हणूनही‎पाहिले आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा ट्रोल करणारा‎अंदाजही आपण पाहिला. पण काँग्रेस पुढची निवडणूक‎जिंकली, तर राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात काय‎नवीन विचार घेऊन येतील, याबद्दल देशात अजूनही‎स्पष्टता नाही. आतापर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्षतेपासून ते‎‘मोहब्बत की दुकान”, ‘पाच न्याय”, जातीनिहाय‎जनगणना आणि आता विद्यार्थ्यांची आंदोलने अशा‎अनेक मुद्द्यांना आणि घोषणांना हाताळून पाहिले आहे.‎ पण आगामी काळात राहुल गांधी यांच्यासमोरील सर्वात‎मोठे आव्हान ते स्वतःच आहेत. उपहास आणि तिखट‎टीकेला त्यांनी राजकारणाची ओळख बनवले आहे.‎आता ते ही शैली बदलून एक विश्वासार्ह राजकीय‎विचार मांडू शकतील का? याद्वारे 2029 मध्ये काँग्रेस‎एक उत्तम पर्याय म्हणून समोर येईल?‎ ( लेखिकेच्या हे वैयक्तिक मत आहे.)‎ राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणते‎विचार, धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हे‎स्पष्टपणे सांगायला हवे. काँग्रेसचे‎सरकार आल्यास त्याचा‎देशवासीयांसाठी काय अर्थ असेल, हे‎त्यांनी मांडले पाहिजे. तरुणांसाठी ही‎बाब खूप महत्त्वाची आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत