Headlines

Rat Snake found at Shah Rukh Khan bungalow:


मुंबई: पावसाळ्याचा जोर वाढताच मुंबई आणि लगतच्या उपनगरीय भागांत सापांचे दर्शन होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळं जमिनीतील बिळांमध्ये आणि गटारांमध्ये पाणी साचल्यानं साप आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून सुरक्षित व कोरड्या जागेच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. तर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात दोन साप एकमेकांत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती.

‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात आढळले दोन साप

१७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८:०० वाजता बॉलिवूड अभिनेताशाहरूख खान याच्या वांद्रे (पश्चिम) इथल्या ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात दोन साप एकमेकांत गुंडाळलेल्या अवस्थेत फिरत असल्याचा फोन सर्पमित्र विक्की दुबे यांना आला. माहिती मिळताच त्यांनी तातडीने या घटनेची नोंद वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपकदादा गायकवाड व मुंबई रेंज ऑफिस, ठाणे यांच्या कंट्रोल रूमला दिली.

Maharashtra TimesTukaram Mundhe: फार काही ग्रेट, वेगळं करतायत असं नाहीये; तुकाराम मुंढेंबद्दलच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर, सोशल मीडियावर चर्चा
घटनास्थळी वन विभागाच्या टीमसह विक्की दुबे पोहोचले असता,मन्नतबंगल्याच्या पटांगणातील एका शिडीखाली ८ फूट लांबीचा धामण जातीचा साप वेटोळे घालून भेदरलेल्या अवस्थेत बसलेला आढळला. विक्की दुबे यांनी कोणतीही दुखापत न होऊ देता या सापाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू केलं. मात्र, लोकांची हालचाल वाढल्यामुळे दुसरा साप परिसरातील आडोशाचा फायदा घेऊन निसटला.

दुसरा साप न सापडल्यानं सुरुवातीला सुरक्षा रक्षक आणि घरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु, रेस्क्यू केलेला साप हा ‘धामण’ (बिनविषारी) प्रजातीचा असल्याचे सांगत विक्की दुबे यांनी उपस्थितांना धीर दिला आणि सापांबद्दलची योग्य माहिती देऊन घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं मन्नत बंगल्यातील सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Maharashtra TimesSaif Ali Khan Uri Visit: जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे तैमूर आणि जेहच्या मनात भीती, ‘उरी’ भेटीदरम्यान अभिनेता सैफ अली खानचं वक्तव्य
दुसऱ्या सापाचा रात्री उशिरापर्यंत शोध

दुसऱ्या सापाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता, मात्र तो मिळून आला नाही. वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेस्क्यू केलेल्या या ८ फूट धामण सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आलं आहे.

अनुराग कांबळे

लेखकाबद्दलअनुराग कांबळेगेली १५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. लोकसत्ता आणि मिड-डे या वृत्तपत्रांमध्ये काम. दीड दशकात शिक्षण, आरोग्य, गुन्हेविश्व यात पत्रकारिता करण्याचा अनुभव महाराष्ट्र टाइम्समधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये कॉपी राइटर म्हणून काम केले होते. आता महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत