Headlines

Gadchiroli Fisheries Training Center to be set up in Chamorshi approval granted by Fisheries Ports Minister Nitesh Rane.


Gadchiroli Charmoshi: गडचिरोली जिल्हा जलसंपत्तीने समृद्ध असल्याने मत्स्यपालनासाठी येथे मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत उपलब्ध आहेत.मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंत्रालयातील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बाबतची बैठक सोमवारी मंत्री राणे यांच्या दालनात झाली.

मत्स्यव्यवसाय
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी चामोर्शी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक मच्छीमार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या केंद्रामागील उद्देश आहे. या केंद्राचे काम वेगाने पूर्ण करून लवकर उद्घाटनासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिले.

सोमवारी मंत्री राणे यांच्या दालनात बैठक झाली

गडचिरोली जिल्ह्यात विभागीय स्तरावरील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत सोमवारी मंत्री राणे यांच्या दालनात बैठक झाली. गडचिरोली जिल्हा जलसंपत्तीने समृद्ध असून मत्स्यपालनासाठी येथे मोठ्या प्रमाणावर जलस्रोत उपलब्ध आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १ हजार ६४५ तलाव, २३ सिंचन तलाव, २ हजारांहून अधिक शेततळी तसेच इतर वैयक्तिक जलस्रोत आहेत.

मच्छीमार आजही पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय करतात

या जलस्रोतांमुळे ६ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्रमत्स्यपालनासाठीउपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमार आजही पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय करतात. उपलब्ध जलसंपत्तीचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढवायचे असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व सुविधा केंद्र उभारण्याचे काम मे २०२६पासून सुरू

नागपूर येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालय परिसरात विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व सुविधा केंद्र उभारण्याचे काम मे २०२६पासून सुरू आहे. त्यामुळे नागपूर विभागासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याऐवजी उपलब्ध सुविधांचा वापर करून गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: ‘घरकुल योजने’साठी पाच ब्रास वाळू उपलब्ध; मोफत वाळूसाठी ९३२ लाभार्थी पात्र

सरकारची मान्यता

गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र, आधुनिक मत्स्यबीज केंद्र आणि संबंधित सुविधा उभारण्यासाठी कनेरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या अखत्यारितील २.८९ हेक्टर विनावापर जमीन मत्स्यव्यवसाय विभागाला उपलब्ध करून देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: रस्त्यांचे पॅचवर्क सुरू, कामासाठी तब्बल ९९ लाखांचा खर्च;महापालिकेसमोर खर्चाचे आव्हान

स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी

चामोर्शी हे भौगोलिकदृष्ट्या सोयीचे ठिकाण असल्याने विभागातील मच्छीमार आणि मत्स्यकास्तकारांना प्रशिक्षणासाठी ये-जा करणे सोपे होणार आहे. या केंद्रामुळे गडचिरोलीसह नागपूर विभागातील मत्स्य उत्पादन वाढण्यास, मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशा सुविधा असतील.

प्रस्तावित विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आधुनिक प्रशिक्षण सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण सुविधा, मत्स्यखाद्य व पोषण प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, तांत्रिक माहिती केंद्र, मत्स्यरोग निदान प्रयोगशाळा, पुनर्चक्रित जलसंवर्धन प्रणालीचे प्रात्यक्षिक केंद्र आणि लघु मत्स्यप्रक्रिया केंद्र अशा सुविधा असतील.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा