Headlines

आधार कार्डवरून बँक खाते होऊ शकते रिकामे; घरबसल्या नंबर लपवण्याचा सोपा मार्ग। Maharashtra Times


देशात आधार कार्डच्या आधारे होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ‘मास्क आधार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये तुमच्या आधारचे सुरुवातीचे 8 अंक लपवले जातात. हे सुरक्षित कार्ड घरबसल्या मोबाईलवर अवघ्या 2 मिनिटांत ऑनलाईन कसे डाऊनलोड करायचे, याची स्टेप बाय स्टेप गाईड खालीलप्रमाणे आहे.

masked Aadhaar online। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
हॉटेल बुकिंग, सिम कार्ड किंवा इतर ठिकाणी मूळ आधार कार्ड देणे आता धोक्याचे ठरू शकते. डिजिटल सुरक्षेसाठी UIDAI ने आधार नंबर सुरक्षित ठेवण्याची सुविधा दिली आहे. जर तुम्हालाही कोणत्याही गैरप्रकाराला बळी करायचे नसेल, तर आमच्या या विशेष माहितीच्या मदतीने तुमचे वैयक्तिक आधार कार्ड आजच लॉक आणि सुरक्षित करा.

डिजिटल इंडियाच्या युगात आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा आणि बँकिंग व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज बनले आहे. मात्र, याच सोयीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी आधार फसवणुकीचे नवीन मार्ग शोधले आहेत. यावर मात करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ‘मास्क आधार’ (Masked Aadhaar) हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय दिला आहे.

मास्क आधार म्हणजे नक्की काय आणि ते ऑनलाईन कसे मिळवायचे, याची सविस्तर स्टेप बाय स्टेप गाईड खालीलप्रमाणे आहे.

मास्क आधार म्हणजे काय?

सामान्य आधार कार्डवर तुमचे संपूर्ण 12 अंक स्पष्ट दिसतात. मात्र, मास्क आधारमध्ये सुरुवातीचे 8 अंक लपवले जातात आणि तिथे ‘XXXX-XXXX’ असे लिहिले जाते. यामध्ये केवळ शेवटचे 4 अंकच दृश्यमान असतात. हे कार्ड कायदेशीररित्या सर्व ठिकाणी ओळखपत्राचा पुरावा म्हणून वैध मानले जाते, पण यामुळे तुमचा मुख्य आधार नंबर कोणालाही समजत नाही.

घरबसल्या मास्क आधार डाऊनलोड करण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

  • सर्वात आधी UIDAI MyAadhaar Portal या अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्या.
  • होम पेजवर असलेल्या ‘Login’ या बटनावर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी मूळ आधार नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP (वन टाइम पासवर्ड) येईल, तो टाकून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
  • लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डवरील सेवांच्या यादीतून ‘Download Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमचे नाव आणि पत्ता दिसेल. त्याच्या अगदी वर ‘Do you want a masked Aadhaar?’ असा एक छोटा बॉक्स दिसेल, त्यावर टिक (Checkmark) करा.
  • शेवटी खाली दिलेल्या ‘Download’ बटनावर क्लिक करा. तुमची सुरक्षित मास्क आधारची PDF फाईल मोबाईल किंवा लॅपटॉपवर सेव्ह होईल.

PDF फाईल उघडण्यासाठी पासवर्ड

डाऊनलोड झालेली फाईल सुरक्षित पासवर्ड प्रोटेक्टेड असते. ही फाईल उघडण्यासाठी तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अक्षरे कॅपिटलमध्ये आणि तुमचे जन्माचे वर्ष (YYYY) सलग टाईप करावे लागेल उदा. जर नाव RAHUL आणि जन्माचे वर्ष 1995 असेल, तर पासवर्ड RAHU1995 असा असेल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा