Headlines

7900mAh ची मोठी बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह Poco M8x 5G बाजारात, फीचर्सही खास’। Maharashtra Times


स्मार्टफोन उत्पादक कंपनी पोकोने भारतीय बाजारात आपला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Poco M8x 5G अधिकृतपणे लाँच केला आहे. अवघ्या 20,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये तब्बल 7,900mAh ची अक्राळविक्राळ बॅटरी आणि गुळगुळीत अनुभवासाठी 120Hz चा रिफ्रेश रेट असलेला दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Poco M8x 5G Launched । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्ही दमदार बॅटरी बॅकअप असलेला नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर पोकोचा नवा 5G फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीने यात स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिला आहे. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारा हा फोन कमी बजेटमध्ये प्रीमियम परफॉर्मन्स देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

पोकोने आधी जाहीर केल्याप्रमाणे आपला नवीन POCO M8x 5G स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. कंपनीने आपल्या स्वस्त आणि मध्यम बजेटमधील स्मार्टफोनच्या यादीत हा एक मोठा बदल केला आहे. या नवीन 5G फोनमध्ये प्रामुख्याने दमदार बॅटरी लाईफ, फोन गरम होऊ नये म्हणून विशेष कूलिंग सिस्टीम, नवीन शक्तिशाली प्रोसेसर आणि जास्त वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सचा सपोर्ट या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

कॅमेरा सिस्टीम

या स्मार्टफोनच्या पाठीमागील भागात 50MP चा AI मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो 2x इन-सेन्सर झूम (2x In-Sensor Zoom) ला सपोर्ट करतो. या मुख्य कॅमेऱ्यासोबत एक दुय्यम सेन्सर देखील जोडण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनच्या समोरील भागात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे

बॅटरी, चार्जिंग क्षमता

या स्मार्टफोनमध्ये 7,900mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी सामान्य वापरामध्ये तब्बल तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम आहे. याशिवाय, हा फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे अवघ्या 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये जवळपास दिवसभर पुरेल इतका चार्ज मिळतो. विशेष म्हणजे, यात 22.5W रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे इतर डिव्हाइसेस किंवा दुसरे फोन सहज चार्ज करू शकता.

परफॉर्मन्स

POCO M8x हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 मोबाईल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. हा प्रोसेसर अतिशय कमी ऊर्जा वापरणाऱ्या 4nm प्रक्रियेवर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे ॲप्स उघडण्याचा वेग तब्बल 43 टक्क्यांनी वाढतो. या फोनमध्ये वेगवान कामगिरीसाठी LPDDR4X रॅम (RAM) आणि UFS 2.2 अंतर्गत स्टोअरेज देण्यात आले आहे. याच्या 6GB रॅम असणाऱ्या बेस व्हेरियंटमध्ये तुम्ही 6GB व्हर्च्युअल रॅम वाढवून एकूण 12GB पर्यंत रॅमचा वापर करू शकता.

थर्मल मॅनेजमेंट आणि कुलिंग सिस्टीम

फोन सतत वापरताना किंवा गेमिंग करताना त्याची कामगिरी सर्वोत्तम राहण्यासाठी आणि तो गरम होऊ नये म्हणून, यात मल्टी-लेअर ‘ट्रिपल कुलिंग सिस्टीम’ देण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये पुढील तीन महत्त्वाचे स्तर समाविष्ट आहेत.

12,439 mm² आकाराची अतिशय मोठी ग्रॅफाइट शीट. मुख्य भागांमधील उष्णता बाहेर टाकण्यासाठी 1,924 mm² चा कॉपर फॉइल थर. प्रोसेसर आणि कुलिंग लेअर्सच्या मध्ये 3.5W क्षमतेचे उच्च-कार्यक्षम थर्मल जेल बसवले आहे.

POCO M8x 5G चे इतर स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: 6.9-inch (720 x 1600 pixels) HD+ LCD स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass 7i चे प्रोटेक्शन दिले आहे.
  • प्रोसेसर: Octa-Core (2×2.4GHz Cortex-A78 & 6×2GHz Cortex-A55) Qualcomm Snapdragon 4 Gen 5 4nm SoC प्रोसेसर असून यात Adreno 613 GPU ग्राफिक्स कार्ड वापरण्यात आले आहे.
  • रॅम आणि स्टोअरेज: 4GB / 6GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोअरेज दिले आहे, जे microSD कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.
  • ऑपरेटिंग सिस्टीम (OS): हा फोन Android 16 वर आधारित असणाऱ्या नवीन Xiaomi Hyper OS 3 वर काम करतो.
  • सिम सपोर्ट: Dual SIM (nano + nano + microSD) चा सपोर्ट असून यासाठी स्वतंत्र कार्ड स्लॉट दिला आहे.
  • सेन्सर्स आणि ऑडिओ: सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, 3.5mm ऑडिओ जॅक आणि दर्जेदार आवाजासाठी स्टिरिओ स्पीकर्स (Stereo Speakers) मिळतात.
  • धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा: हा फोन IP64 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्याचे हलके शिंतोडे सहज सहन करू शकतो.
  • वजन आणि आकार: आकाराने हा फोन 170.12×78.43×8.8mm असून याचे एकूण वजन 232g ग्रॅम आहे.
  • कनेक्टिव्हिटी: यात 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.1, GPS + GLONASS आणि चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिला आहे.

फोनच्या रंगांचे प्रकार

POCO M8x 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये प्रीमियम व्हेगन लेदर बॅक (Vegan Leather Back) असलेला ग्रीन (हिरवा) रंग, तसेच कोबाल्ट ब्लू (निळा) आणि ब्लॅक (काळा) रंगांचा समावेश आहे.

किंमत

  • 4GB + 128GB बेस मॉडेलची किंमत Rs. 20,999 आहे.
  • 6GB + 128GB टॉप मॉडेलची किंमत Rs. 22,999 आहे.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा