वृत्तसंस्था, अर्लिंग्टन, टेक्सास : शनिवारी रात्री जॉर्डनविऊद्ध 3-1 असा विजय मिळवून गतविजेत्या अर्जेंटिनाने गट फेरीतील तिन्ही सामने जिंकले. या सामन्यात लायोनेल मेस्सीव्यतिरिक्त गोल करणारा जिओव्हानी लो सेल्सो हा या विश्वचषकातील अर्जेंटिनाचा पहिलाच खेळाडू ठरला.
आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात सुऊवातीपासून खेळताना लो सेल्सोने 19 व्या मिनिटाला थेट फ्री-किकद्वारे गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रामध्ये मैदानात उतरल्यानंतर मेस्सीनेही एक गोल केला. या गोलसह वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करण्याचा त्याचा विक्रम 19 गोलांवर पोहोचला आहे.
या स्पर्धेत सहा गोल करून आघाडीवर असलेल्या मेस्सीला सुऊवातीच्या फळीत ठेवले नव्हते. कारण हा सामना सुरू होण्यापूर्वीच अर्जेंटिनाने ‘गट जे’मधील आपले पहिले स्थान निश्चित केले होते. मागील सामन्यात विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम याच स्टेडियमवर मेस्सीने मोडला होता. आपल्या 39 व्या वाढदिवसानंतर तीन दिवसांनी लढतीच्या 60 व्या मिनिटाला तो मैदानात उतरला आणि 80 व्या मिनिटाला त्याने गोल केला.
31 व्या मिनिटाला पेनल्टी कीकवर गोल करून लाउटारो मार्टिनेझने अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याचा जवळून मारलेला फटका ‘क्रॉसबार’ला आदळल्याने चेंडू परत फिरला. मेस्सीसाठी ज्याला बाहेर काढण्यात आले तो मार्टिनेझ आणि गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ हेच तेवढे अर्जेंटिनाच्या तिन्ही गट सामन्यांमध्ये सुऊवातीपासून खेळलेले खेळाडू ठरले आहेत. दुसरीकडे, लो सेल्सो आणि मार्टिनेझ या दोघांनीही अर्जेंटिनासाठी त्यांचे पहिले विश्वचषक गोल नोंदवले.
गेल्या नऊ विश्वचषक सामन्यांमध्ये सात विजय आणि दोन बरोबरी नोंदवणाऱ्या अर्जेंटिनाचा सामना शुक्रवारी 32 संघांच्या फेरीत केप वर्देविऊद्ध होणार आहे. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला मैदानात आलेल्या मौसा अल्तामारीने 55 व्या मिनिटाला जॉर्डनसाठी गोल केला.
मेस्सी सलग सात विश्वचषक लढतींत गोल करणारा पहिला खेळाडू
अल्जेरिया आणि ऑस्ट्रियाविऊद्धच्या विजयांमध्ये अर्जेंटिनाचे पाचही गोल मेस्सीनेच केले होते. यात त्याच्या पहिल्या वर्ल्ड कप हॅट्ट्रिकचा आणि सोमवारी विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सामन्यातील दोन गोलांचा समावेश होता. सलग सात विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरण्याचा मान त्याने आता पटकावला आहे. यापूर्वी सलग सहा विश्वचषक सामन्यांत गोल केलेले फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलचा महान खेळाडू जेरझिन्हो यांच्याशी त्याची बरोबरी झाली होती.
