Headlines

सोलर कूकरसाठी घरपट्टीत मिळावी सवलत ; माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे आवाहन


Nashik Solar Cooker :अमेरिका -इराण युध्दाचा परिणाम हा एलपीजीवरती झालेला दिसतो.त्यामुळे सोलर कूकर हीच काळाची गरज आहे. यासाठी महापालिकेने सोलर कूकर, सोलर पॅनल बसविणाऱ्यां मिळकतदारांना दहा टक्के सवलत द्यावी असा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.

सोलर कूकर
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक:अमेरिका-इराणच्या युद्धजन्य परिस्थितीत एलपीजी महाग झाला. पुढच्या काही वर्षांत गॅसच संपून जाईल. अशावेळी ‘ सोलर कूकर ’ हीच काळाची गरज ठरणार आहे. इमारतींवर सोलर पॅनल, सोलर कूकर बसविणाऱ्यांना महापालिकेने मिळकतकरात दहा टक्के सवलत योजना आखल्यास नागरिक ‘सोलर’च्या वापराकडे वळतील, असा विश्वास माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री विजय नवल पाटील यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

औद्योगिक व तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

‘डीएलएएमपीआयए’च्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित इंटर इंजिनीअरिंग आणि सोलर एशियाच्या औद्योगिक व तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते, मनीष अहिरे, सिद्धेश स्वामी, मनीष तांबट, आशिष देशमुख, नकुल बोराडे, आकाश राजोळे, विवेक ठाकरे, ओम देशमुख, मोनिका जाधव, चंद्रकांत भदाणे आदी उपस्थित होते.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News: विभागीय क्रीडा संकुलामध्ये उत्तम सुविधा द्या ; आयुक्तांचे निर्देश

पुढच्या काही वर्षांत गॅस संपू शकतो

पाटील म्हणाले, ‘भविष्यात केवळ युद्धामुळेच गॅस मिळणार नाही असे नाही. पुढच्या काही वर्षांत गॅस संपू शकतो. अशावेळी ‘सोलर कूकर’ हा अधिक आश्वासक पर्याय ठरणार आहे. सोलर कूकरवर ८० टक्के स्वयंपाक होतो. म्हणजे केवळ२० टक्केच गॅसचा वापर होईल. केंद्र सरकारची रुफटॉप सोलर योजनाही पसंतीला उतरते आहे असे पाटील म्हणाले.

तर उर्जेची बचत होईल

सरकारी रुग्णालये, महापालिकेच्या शाळांवर सोलर बसविले तर उर्जेची बचत होईल. या प्रदर्शनात अभियांत्रिकी, सौरऊर्जा, हरित तंत्रज्ञान, औद्योगिक उत्पादन, ऊर्जा संवर्धन, नवकल्पना संबंधित विविध उत्पादने, सेवा आणि संशोधनाचे सादरीकरण होणार आहे.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

सोलर कूकरची रचना

सोलर कूकर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेचा वापर करून जेवण तयार करणार एक माध्यम आहे.अगदी पर्यावरणपूरक वातावरणात जेवण करून याद्वारे इंधनाची बचत देखील केली जाते.या सोलर कूकरची एक विशिष्ट रचना आहे. ही एक लाकडी धातूची पेटी असते. ही पेटी आतून पूर्णपणे काळ्या रंगाची असते. काळा रंग हा जास्तीत जास्त उष्णता शोषूण घेतो.या पेटीचे झाकण हे पारदर्शक आणि काचेच असत.ही काच सूर्यप्रकाश आत येऊ देते आणि आतली उष्णता बाहेर जाऊ देत नाही.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा