सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशांतून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि समन्वयाच्या कामांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा!
निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरातील खड्ड्यांवरूनही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. खड्डे बुजवण्याची जबाबदारी असणाऱ्यांकडून दंड आकारा आणि आवश्यक असल्यास त्यांची पुढील कामे थांबवा, असे निर्देश त्यांनी दिले. “इतका मोठा खर्च करूनही नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असेल, तर आपण कुठे चुकतो आहोत, याचे आत्मपरीक्षण करा,” असेही ते म्हणाले.
हरिद्वार अर्धकुंभाकडे आखाड्यांचे लक्ष
त्र्यंबकेश्वर : येथील आखाड्यांचे लक्ष उत्तराखंडमधील हरिद्वार येथे होणाऱ्या अर्धकुंभाकडे लागले आहे. बहुतांश साधू-महंत कुंभपूर्व तयारीसाठी हरिद्वारमध्ये दाखल झाले आहेत. जानेवारी ते मे २०२७ दरम्यान तेथे कुंभस्नानाचा पर्वकाल असेल. अमृतस्नानानंतर आखाडे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूरखड्ड्यांना ‘एमएनजीएल’ जबाबदार
शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्यांसाठी ‘एमएनजीएल’च्या गॅस पाइपलाइन कामांना जबाबदार धरण्यात आले. गॅस कनेक्शनच्या कामात विलंब होत असल्याची गंभीर दखल घेत, वेळेत काम पूर्ण न केल्यास कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
Tukaram Mundhe : शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, हॉटेल्समध्ये कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची कारवाई‘कंत्राट देताना जात-भाषा पाहिली जात नाही’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. सिंहस्थच काय, कोणतीही कंत्राटे देताना कोणाचीही जात, भाषा किंवा धर्म पाहिला जात नाही. काम पूर्ण करण्याची क्षमता आणि निविदेतील पात्रता यावरच कंत्राट दिले जाते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. फडणवीस म्हणाले की, कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. एखादी कंपनी कोणत्या राज्यातील आहे, यापेक्षा तिची काम पूर्ण करण्याची क्षमता, तांत्रिक पात्रता आणि निविदेतील अटी महत्त्वाच्या असतात. स्पर्धात्मक पद्धतीने कमी दरात कंत्राटे देण्यात आली आहेत. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी तीन स्तरांवर यंत्रणा उभारण्यात आली असून, तपासणी समाधानकारक झाल्यानंतरच कंत्राटदारांना पैसे दिले जातील.

