Headlines

सवत आणि सावत्र मुलांसमोर गौरीने केले आमिर खानसोबत लग्न, पारंपारिक लुकची सोशल मीडियावर एकच चर्चा – aamir khan gauri spratt wedding in traditional wear gauri look stunning in off white lehenga


आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नानंतर समोर आलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, गौरीचा ऑफ-व्हाईट पारंपारिक लुक आणि आमिरचा साधा पण देखणा कुर्ता चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या या मिनिमल वेडिंग स्टाइलचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Aamir Khan Gauri Spratt Wedding
फोटो सौजन्य :- @gauri_spratt
Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान अखेर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. 5 जुलै 2026 रोजी त्याने त्याची दीर्घकाळाची जोडीदार गौरी स्प्रॅट हिच्यासोबत मुंबईतील वांद्रे येथील पाली हिलमधील निवासस्थानी अतिशय खासगी आणि साध्या समारंभात रजिस्टर मॅरेज केले. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील मोजके सदस्य, जवळचे मित्र तसेच दोघांची मुले उपस्थित होती. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

या लग्नातील सर्वात जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे गौरी स्प्रॅटचा पारंपारिक लुक. ऑफ-व्हाईट आणि आयव्हरी शेडमधील पारंपरिक पोशाख, आकर्षक दागिने आणि साधा मेकअप यामुळे गौरीचा एलिगंट अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला. दुसरीकडे आमिरनेही क्रीम रंगाचा पारंपरिक कुर्ता परिधान करून साधेपणाला प्राधान्य दिले. या दोघांचा हा मिनिमल आणि क्लासी लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. (फोटो सौजन्य :- @gauri_spratt)

असा होता गौरी स्प्रॅटचा लुक

असा होता गौरी स्प्रॅटचा लुक

लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती गौरीच्या ब्रायडल लुकची. आयव्हरी आणि ऑफ-व्हाईट रंगाच्या पारंपरिक पोशाखात ती अत्यंत देखणी दिसत होती. त्यासोबत लेयर्ड ज्वेलरी, साधा मेकअप आणि फिशटेल ब्रेड हेअरस्टाईलमुळे तिचा संपूर्ण लुक अधिक आकर्षक दिसत होता.फॅशनप्रेमींनी गौरीच्या या लुकचे भरभरून कौतुक केले. अनेकांनी “सिंपल इज ब्युटिफुल”, “एलिगंट ब्राइड” आणि “रॉयल लुक” अशा प्रतिक्रिया देत तिच्या स्टाईलची प्रशंसा केली.

पारंपारिक दागिन्यांनी पूर्ण केला लुक

पारंपारिक दागिन्यांनी पूर्ण केला लुक

गौरी स्प्रॅटने तिचा ब्रायडल लुक अत्यंत साधा, पण तितकाच आकर्षक ठेवला. ऑफ-व्हाईट लेहेंग्यासोबत तिने पारंपारिक दागिन्यांची निवड केली होती. गळ्यातील नाजूक हार, कानातील आकर्षक झुमके, कपाळावरील टिकली आणि हातातील बांगड्यांनी तिच्या संपूर्ण लुकला एक राजेशाही स्पर्श दिला. दागिन्यांचा अतिरेक न करता मिनिमल स्टाइल स्वीकारल्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसले.

आमिरचा साधा पण स्टायलिश अंदाज

आमिरचा साधा पण स्टायलिश अंदाज

लग्नासाठी आमिर खाननेही कोणताही दिखाऊपणा न करता क्रीम आणि आयव्हरी रंगाचा पारंपरिक कुर्ता परिधान केला होता. त्याने लहानसा ब्रोच लावून आपला लुक पूर्ण केला. नववधू-वराचा हा साधेपणा चाहत्यांना विशेष भावला. अनेकांनी “सेलिब्रिटी असूनही साधेपणा जपला” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या.

आमिर खानच्या आयुष्यातील तिसरा विवाह

आमिर खानच्या आयुष्यातील तिसरा विवाह

आमिर खानचा हा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता यांच्यासोबत विवाह केला होता. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. पुढे त्याने किरण राव यांच्याशी लग्न केले, मात्र काही वर्षांपूर्वी दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही आमिर आणि किरण यांनी मुलगा आझादच्या संगोपनासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय कायम ठेवला.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी “नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा”, “गॉड ब्लेस यू” आणि “परफेक्ट कपल” अशा प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे गौरीच्या साध्या आणि पारंपारिक लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ब्रायडल स्टाईल लवकरच वेडिंग फॅशन ट्रेंड ठरेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटील“मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे.

वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. “आणखी वाचा