म.टा.विशेष प्रतिनिधी:‘सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांनी स्वच्छता पाळून आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकण्याचे टाळून सण-उत्सव साजरे केले तर अधिक चांगले होईल. वास्तविक स्वच्छतेचे भान राखून सण-उत्सव साजरे केले तरच त्यांचे खरे महत्त्व अधोरेखित होते’, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘ महाराष्ट्र टाइम्स ’च्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राचा संदर्भ देत नोंदवले. तसेच मुंबई महापालिकेच्या वकिलांना अंकातील ते छायाचित्र दाखवून स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ती पावले उचलण्याच्या सूचनाही केल्या.
कुलाबा येथील कचरा गोळा करण्यात आला लहान मुलांचा सुद्धा होता सहभाग
गुरुवारचा नारळी पौर्णिमेचा सण लक्षात घेऊन कुलाबा येथील बधवार पार्क समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा मांगेला समाजाने एकत्र येत गोळा केला. त्यात लहान मुले-मुलीही सहभागी झाली होती, असे दर्शवणारे छायाचित्र ‘मटा’ने बुधवारी प्रसिद्ध केले.
स्वच्छतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जात
त्याचा संदर्भ न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिला. ‘प्रसारमाध्यमे संवेदनशील असल्याने स्वच्छतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जात असते. तरीही नागरिकांच्या वर्तणुकीत सुधारणा होताना दिसत नाही, असे खंडपीठाने नमूद केले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जमीन शोधण्यासाठी सक्रिय प्रयत्न करण्याची सूचनाही महापालिकेला केली.
खंडपीठाने केली आयुक्तांची प्रशंसा
शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या उपायांची माहिती ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दिली. त्यानंतर खंडपीठाने या उपायांबद्दल आयुक्तांची प्रशंसा केली. त्याचवेळी अनेक सूचनाही केल्या.
पुढील सुनावणी चार आठवड्यांनी
योग्य ते लेखी निर्देश काही दिवसांत अंतरिम आदेशात देण्याचे संकेत देऊन पुढील सुनावणी चारआठवड्यांनीठेवली. ‘कांजूर डम्पिंगमधील कचऱ्याची दुर्गंधी जवळपास संपली असून तक्रारींची संख्या ६००वरून ९०वर आली आहे’, असे सांगतानाच कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा विचार मुंबई महापालिकेने करायला हवा, असे म्हणणे कांजूरचा प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीतर्फे ॲड. साकेत मोने यांनी मांडले.
तर, ‘दुर्गंधी कमी झाल्याबाबत महापालिकेने आकडेवारी दिली असली तरी त्यातील प्रदूषणकारी घटकांचे नोंद झालेले प्रमाण हे प्रमाणित निकषांप्रमाणे नाही’, असे याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अभिजीत राणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
. घरांतून गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या वर्गीकरणावर विशेष भर द्या आणि तसे न करणाऱ्या कुटुंबावर दंड लावा
.सर्वाधिक स्वच्छ वॉर्ड राखण्यात भूमिका बजावणारे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांचा गौरव करून प्रोत्साहन देण्याचा विचार करा.
. अधिकाऱ्यांनी वॉर्डची अचानक पाहणी करून तेथील स्वच्छतेच्या स्थितीचा आढावा घ्यावा.
.सार्वजनिक रस्त्यांवर आणि व्यावसाय़िक आस्थापनांच्या बाहेर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा
. नरिमन पॉइंट व मरीन ड्राइव्ह परिसरातील हॉटेलमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याकडे विशेष लक्ष द्या.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा