Headlines

सगुण-निर्गुण: एक पसा पाणी एक बिल्वदळ! – saint namdev maharaj gatha shivaratri mahatmya abhang


-डॉ. सुनील शिंदे

भगवंताला किमती वस्तू, सोने-दागिने, पैसा, दान-दक्षिणा असे काही अर्पण करण्याची आवश्यकता नसते आणि त्यास मुळीच अपेक्षाही नसते. आजकाल अनेक नामांकित देवस्थानांना महागडे अलंकार, मुकुट, वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याची अहमहमिका लागलेली दिसते! श्रद्धा वाईट नाही, प्रदर्शन मात्र चुकीचे.

संत नामदेवांनी बालवयात विठ्ठलास साखर-दुधाचा नैवेद्य दिला. कधी संत ज्ञानोबा माउलींनी ‘अमृतानुभव’ अन् ‘ज्ञानेश्वरी’ रूपातील ग्रंथ निरूपणाचा महाप्रसाद दिला. तर कधी कर्मयोगी संत सावतामाळी यांनी कांदा-मुळा, भाजी अथवा आपल्या शेतातला अन्य वानवळा (पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांकडे सोपवून) – तर कधी घरीच भावभक्तीने अर्पण केला! संत चोखामेळा यांनी निष्ठेने अर्पिलेला कांदा-भाकरीचा नैवेद्य भगवंताने गोडीने घेतला.

संत एकनाथांचा भारूड रूपातला, तर कधी नंतरचा नाथषष्ठीचा महाप्रसाद स्वीकारला. रामायणातील शबरीची बोरे अन् महाभारतातील मित्र सुदाम्याचे पोहे – तांदळाच्या कण्या आवडीने प्रसंगी भगवंत स्वीकारतो… असे कितीएक दाखले सांगावेत महाराज! ईश्वर भावभरल्या प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा भुकेला असतो. पान, फूल, फळ अथवा तुमच्याकडील यथाशक्ती, यथाशक्यतेनुसार जे काही असेल ते फक्त आदराने, आस्थेने अन् काळजातल्या ओलाव्याने भगवंत स्वीकारतो. या संदर्भात संत नामदेव महाराज काय सांगतात पाहा –

एक पसा पाणी एक बिल्वदळ।

पूजन केवळ सोपे बहु।

भक्त पुंडलिकाने आपल्या माता-पित्यांची सेवा करताना कमालीच्या आदराने आतिथ्य करताना देऊ केलेल्या विटेवर उभे राहणे पसंत केलेला विठो युगे लोटली तरीही वीट सोडून खाली उतरायचे नाव घेत नाही. शतकानुशतके असंख्य वारकरी – भाविक या दर्शनासाठी दर वर्षी पंढरीकडे प्रस्थान ठेवतात! अवघ्या विश्वात अशी भावभोळ्या भक्तीची, मायेच्या ओलाव्याने ओथंबून गेलेली वीट अन्यत्र नाही पहायला मिळणार अन् नाही कुणाला तयार करता येणार.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत