Headlines

Amruta fadnavis strong counter to sanjay raut call to stop unnecessary criticism from opponents; रोज सकाळी उठून भोंगा वाजवणे योग्य नाही; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार


नागपूर : “विरोधकांचे काम टीका करणे असले तरी ती टीका विधायक आणि मुद्देसूद असायला हवी. प्रत्येक गोष्टीवर रोज सकाळी उठून भोंगा वाजवणे योग्य नाही. एखाद्या विषयात तथ्य किंवा मुद्दा असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करणे आणि टीका करणे आवश्यक आहे; मात्र नाहक टीका करू नये,” अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘अमृता वहिनींनी हळूहळू दिल्लीला जाण्याची मानसिकता तयार करावी’, असे वक्तव्य केल्याबाबत विचारले असता अमृता फडणवीस यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. “मला वाटतं, मानसिकता आधीच तयार आहे आणि हीच मानसिकता पुढेही राहणार आहे. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करायची आहे. आम्ही घरचे त्यांना साथ देऊ शकलो आहोत आणि पुढेही देऊ. ही मानसिकता महाराष्ट्रासाठी आहे. बाकी त्यांनी त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

“महाराष्ट्र हे आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे राज्य असून मुंबई ही त्याची राजधानी असल्याने राज्याचे महत्त्व अधिक आहे. देवेंद्र फडणवीस दिवस रात्र महाराष्ट्रासाठी काम करत आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने चांगले काम करणे अधिक सोपे होते आणि या कामाचे श्रेय मोदीजींनाही जाते,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपुरात दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून आशा सेविकांसाठी आर्थिक साक्षरता आणि आरोग्यविषयक उपक्रम सुरू करण्यात आला. आशा सेविका सातत्याने लहान मुले आणि मातांसाठी काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुमारे ३०० आशा सेविकांना आर्थिक सशक्तीकरणासोबत स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा घटना घडता कामा नयेत. सरकारने संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. मात्र अशा घटनांवर तातडीने कारवाई करण्यासोबतच त्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही आवश्यक आहेत, तसेच सामाजिक संस्थांनी आश्रमशाळा दत्तक घेऊन त्यांचे अपग्रेडेशन करण्याबाबतही विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जुन्नरमधील बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी कायदे असले तरी समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय, याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आरोपींचे मूल्य आणि संस्कारही तपासण्याची गरज आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तेच राष्ट्र पुढे जाते, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये तिसऱ्या मुलासाठी मॅटरनिटी लिव्ह देण्याच्या घोषणेवरही त्यांनी सावध भूमिका मांडली. मुलाला जन्म देणाऱ्या महिलेला संगोपनासाठी वेळ आणि सुट्टी मिळणे हा तिचा अधिकार आहे. मात्र देशाची लोकसंख्या आधीच मोठी असल्याने तिसऱ्या मुलासाठी मॅटरनिटी लिव्ह देणे कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत