वडेट्टीवार मराठा-ओबीसी वाद पेटवतायत, हकालपट्टी केली नाही तर काँग्रेसला संपवू, महेश डोंगरेंचा इशारा – mahesh dongre demands vijay wadettiwar s expulsion from congress
वडेट्टीवार मराठा-ओबीसी वाद पेटवतायत, हकालपट्टी केली नाही तर काँग्रेसला संपवू, महेश डोंगरेंचा इशारा – mahesh dongre demands vijay wadettiwar s expulsion from congress
मराठा आरक्षण प्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात मराठा समाज नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी तर वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही डोंगरेंनी केली.