Headlines

वटपौर्णिमेला नक्की बनवा मॅंन्गो फ्लेवरची सात्विक लुसलुशीत पुरणपोळी, असं तयार करा श्रद्धेने सजलेलं वटपौर्णिमा पूजेचं ताट – puran poli recipe for vat purnima recipe shared by tejashri murkute dokhe


वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक नैवेद्याला खास ट्विस्ट देत मँगो फ्लेवरची सात्विक आणि लुसलुशीत पुरणपोळी नक्की बनवून पाहा. आंब्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि सुगंधामुळे ही पुरणपोळी चवीला अधिक स्वादिष्ट लागते. पूजेच्या ताटाची शोभा वाढवणारी ही सोपी रेसिपी घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल.

Vat Purnima Naivedya Recipe
फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी
वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली जाते. पूजेनंतर सात्विक नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यंदा पारंपरिक पुरणपोळीला थोडा हटके आणि स्वादिष्ट ट्विस्ट देत मँगो फ्लेवरची सात्विक लुसलुशीत पुरणपोळी बनवली तर पूजेच्या ताटाची शोभा आणि चव दोन्ही वाढतील.

घरगुती पदार्थांमध्ये पुरणपोळीला विशेष स्थान आहे. गोड, मऊ आणि तुपात भाजलेली पुरणपोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आंब्याचा हंगाम असल्याने आंब्याच्या रसाचा वापर करून तयार केलेली ही पुरणपोळी अधिक सुगंधी आणि चविष्ट लागते. ही रेसिपी सहज बनवता येते आणि पूजेसाठीही पूर्णपणे सात्विक आहे.(फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी)

पुरणपोळीसाठी लागणे साहित्य

पुरणपोळीसाठी लागणे साहित्य
  • १ कप आंब्याचा रस
  • १ कप साखर
  • १/२ कप रवा
  • १/२ कप गव्हाचे पीठ
  • १/२ कप मैदा
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार साजूक तूप

पोळी कशी तयार करावी

पोळी कशी तयार करावी

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ताजा आणि गोड आंब्याचा रस घ्या. त्यामध्ये साखर घालून चमच्याने किंवा व्हिस्कच्या मदतीने साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगले ढवळून घ्या. त्यानंतर या मिश्रणात रवा, गव्हाचे पीठ, मैदा (वापरत असल्यास), वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रण एकजीव आणि मऊसर होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्या.

पुरळपोळी कशी बनवावी

पुरळपोळी कशी बनवावी

आता हे मिश्रण झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. या वेळेत रवा आंब्याचा रस शोषून फुगतो, त्यामुळे पोळ्या अधिक मऊ आणि लुसलुशीत बनतात. विश्रांतीनंतर मिश्रण तपासा. जर ते खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा आंब्याचा रस किंवा दोन-तीन चमचे पाणी घालून पुन्हा एकदा मळून घ्या. मिश्रण पोळी लाटण्याइतके मऊ आणि लवचिक असावे.त्यानंतर मिश्रणाचे समान आकाराचे गोळे तयार करा. पोळी लाटण्यासाठी पोळपाटावर थोडे गव्हाचे पीठ भुरभुरवा आणि प्रत्येक गोळा हलक्या हाताने गोल आकारात लाटा. पोळी फार पातळ किंवा जाड लाटू नये.

वटपौर्णिमा स्पेशल रेसिपी

तवा गरम करून घ्या

तवा गरम करून घ्या

आता तवा मध्यम आचेवर गरम करा. गरम तव्यावर पोळी टाका आणि एका बाजूने हलके फुगू लागल्यावर ती उलटा. दोन्ही बाजूंना साजूक तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पोळी मऊ राहावी म्हणून ती जास्त वेळ भाजू नका. गरमागरम मँगो फ्लेवरची सात्विक लुसलुशीत पोळी तयार आहे. वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी ही पोळी साजूक तूप टाकून खाऊन घ्या.

पुरळपोळी करताना या गोष्टी करा

पुरळपोळी करताना या गोष्टी करा
  • मध्यम आचेवरच पोळी भाजा, त्यामुळे ती आतून व्यवस्थित शिजते आणि बाहेरून छान सोनेरी होते.
  • भाजताना साजूक तूप लावा, यामुळे पोळी अधिक मऊ, चविष्ट आणि सुगंधी लागते.
  • गरमागरम सर्व्ह करा, तुपासोबत किंवा दुधासोबत वाढल्यास तिची चव अधिक खुलून येते.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटील“मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे.

वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. “आणखी वाचा