वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक नैवेद्याला खास ट्विस्ट देत मँगो फ्लेवरची सात्विक आणि लुसलुशीत पुरणपोळी नक्की बनवून पाहा. आंब्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि सुगंधामुळे ही पुरणपोळी चवीला अधिक स्वादिष्ट लागते. पूजेच्या ताटाची शोभा वाढवणारी ही सोपी रेसिपी घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल.

घरगुती पदार्थांमध्ये पुरणपोळीला विशेष स्थान आहे. गोड, मऊ आणि तुपात भाजलेली पुरणपोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आंब्याचा हंगाम असल्याने आंब्याच्या रसाचा वापर करून तयार केलेली ही पुरणपोळी अधिक सुगंधी आणि चविष्ट लागते. ही रेसिपी सहज बनवता येते आणि पूजेसाठीही पूर्णपणे सात्विक आहे.(फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी)
पुरणपोळीसाठी लागणे साहित्य
- १ कप आंब्याचा रस
- १ कप साखर
- १/२ कप रवा
- १/२ कप गव्हाचे पीठ
- १/२ कप मैदा
- १/४ टीस्पून वेलची पूड
- चिमूटभर मीठ
- आवश्यकतेनुसार साजूक तूप
पोळी कशी तयार करावी
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ताजा आणि गोड आंब्याचा रस घ्या. त्यामध्ये साखर घालून चमच्याने किंवा व्हिस्कच्या मदतीने साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगले ढवळून घ्या. त्यानंतर या मिश्रणात रवा, गव्हाचे पीठ, मैदा (वापरत असल्यास), वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रण एकजीव आणि मऊसर होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्या.
पुरळपोळी कशी बनवावी
आता हे मिश्रण झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. या वेळेत रवा आंब्याचा रस शोषून फुगतो, त्यामुळे पोळ्या अधिक मऊ आणि लुसलुशीत बनतात. विश्रांतीनंतर मिश्रण तपासा. जर ते खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा आंब्याचा रस किंवा दोन-तीन चमचे पाणी घालून पुन्हा एकदा मळून घ्या. मिश्रण पोळी लाटण्याइतके मऊ आणि लवचिक असावे.त्यानंतर मिश्रणाचे समान आकाराचे गोळे तयार करा. पोळी लाटण्यासाठी पोळपाटावर थोडे गव्हाचे पीठ भुरभुरवा आणि प्रत्येक गोळा हलक्या हाताने गोल आकारात लाटा. पोळी फार पातळ किंवा जाड लाटू नये.
वटपौर्णिमा स्पेशल रेसिपी
तवा गरम करून घ्या
आता तवा मध्यम आचेवर गरम करा. गरम तव्यावर पोळी टाका आणि एका बाजूने हलके फुगू लागल्यावर ती उलटा. दोन्ही बाजूंना साजूक तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पोळी मऊ राहावी म्हणून ती जास्त वेळ भाजू नका. गरमागरम मँगो फ्लेवरची सात्विक लुसलुशीत पोळी तयार आहे. वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी ही पोळी साजूक तूप टाकून खाऊन घ्या.
पुरळपोळी करताना या गोष्टी करा
- मध्यम आचेवरच पोळी भाजा, त्यामुळे ती आतून व्यवस्थित शिजते आणि बाहेरून छान सोनेरी होते.
- भाजताना साजूक तूप लावा, यामुळे पोळी अधिक मऊ, चविष्ट आणि सुगंधी लागते.
- गरमागरम सर्व्ह करा, तुपासोबत किंवा दुधासोबत वाढल्यास तिची चव अधिक खुलून येते.

