IND vs ENG 3rd ODI News : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स वनडेनंतर निवृत्ती घेणार अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यावर आता बीसीसीआयने मौन सोडत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच रोहितचा जुना सहकारी पार्थिव पटेल यानेही रोहितबाबत एक मोठे विधान केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ओपनर रोहित शर्मा च्या वनडे भविष्याबाबत सध्या सोशल मीडियापासून ते माध्यमांपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे सामना हा हिटमॅनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, अशी जोरदार अफवा पसरली होती. मात्र, आता बीसीसीआयने या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला असून रोहित शर्मा सध्या कोणतीही निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रोहित भारतीय वनडे संघाचा महत्त्वाचा भाग राहून पुढेही खेळत राहणार आहे.
लॉर्ड्सवर रोहितच्या बॅटमधून शतक निघणार!
या सर्व निवृत्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माचा जुना मित्र आणि भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल त्याच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. पार्थिवने रोहितबाबत एक मोठा दावा केला आहे. पार्थिव पटेलने एका मुलाखतीत सांगितले की, जर लॉर्ड्सचा हा सामना रोहितचा शेवटचा सामना ठरला, तर तो आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडे बंद करेल. जर लॉर्ड्स वनडे खरोखरच त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच असेल, तर रोहित शर्मा एका शानदार शतकासह निरोप घेऊ इच्छितो आणि तो असे करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
पार्थिवने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फलंदाजीच्या शैलीची तुलना करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. रोहित कदाचित प्रत्येक सामन्यात धावा करणार नाही, पण जेव्हा त्याची बॅट चालते, तेव्हा तो खूप मोठी आणि मॅचविनिंग इनिंग खेळतो. कार्डिफमधील दुसऱ्या वनडेत रोहितने २६ धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर तो चांगल्या लयीत दिसला नव्हता. यावर पार्थिव म्हणाला की, रोहितसाठी टीकाकारांना शांत करण्याची ही एक उत्तम संधी आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा आपल्या बॅटनेच मैदानातून चोख उत्तर दिले आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. माध्यमांमध्ये रोहितच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉर्ड्सवर होणारा तिसरा सामना रोहितचा शेवटचा सामना असेल, अशी कोणतीही चर्चा बोर्ड किंवा निवड समितीमध्ये झालेली नाही. रोहित भारतीय संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून तो पूर्ण वचनबद्धतेने देशासाठी खेळत राहील, असे सांगत त्यांनी चाहत्यांना दिलासा दिला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा