Headlines

मेक्सिकोने 40 वर्षांनी गाठली बाद फेरी, रात्रभर जल्लोष पण विजयाला लागलं गालबोट, चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू


Mexico City stampede News : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ४० वर्षांनी मेक्सिकोने बाद फेरीची लढत जिंकली. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मेक्सिको सिटीतील मुख्य मार्गावर पाठीराख्यांनी गर्दी केली. त्या वेळी चेंगराचेंगरी झाली. अनेकांना श्वास घेणे अवघड झाले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

Mexico City stampede
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मेक्सिको सिटीची ओळख असलेल्या ‘अँजेल ऑफ इंडिपेंडन्स’च्या परिसरात लाखो पाठीराखे एकत्र आले. त्या परिसरात सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जात होते. मेक्सिकोच्या विजयानंतर चाहत्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला. पॅसेओ डे ला रिफॉमां या सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात तिघे बेशुद्धावस्थेत आढळले. मृतांत ४४ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला आणि १९ वर्षीय युवतीचा समावेश आहे. दरम्यान, मेक्सिको सिटी तसेच मेक्सिकोतील अनेक शहरात जल्लोष रात्रभर सुरू होता. त्यात अनेक जण बेशुद्ध झाले असे सांगण्यात येत आहे.
Maharashtra TimesFIFA World Cup 2026 Tickets : फुटबॉल वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटे आवाक्याबाहेर, सर्वात स्वस्त तिकीट 3 लाख रुपये
मद्याचे सेवन मर्यादित करा टोरांटो पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉल लढतीच्यावेळी कमालीची उष्णता असेल. सामन्यास उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांनी मद्याचे सेवन मर्यादित करावे तसेच भरपूर पाणी प्यावे, अशी सूचना पर्यावरण मंत्रालयाने केली आहे. मद्याचे जास्त सेवन केल्यास निर्जलीकरणाचा त्रास वाढू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

नॉर्वेतील जल्लोषात मेट्रोचे नुकसान

वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिला अडथळा पार झाल्यावर नॉर्वेवासीय बेभान झाले. त्यांनी आपल्या व्हायकिंग रोद्वारे (रोईंग करण्याची कृती) आपला जल्लोष साजरा केला. मात्र, काही अतिबेभान पाठीराख्यांच्या जल्लोषामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे; तसेच मेट्रोचे नुकसान झाले. लाल, निळा आणि पांढरा या नॉर्वेच्या ध्वजावरील रंगाची जर्सी परिधान केलेल्या नॉर्वेवासीयांनी अनेक शहरातील मुख्य ठिकाणी गर्दी केली. त्यातही ओस्लो येथील रॉयल पॅलेसपासून ते कार्ल जोन्सपर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर हा ‘व्हायकिंग रो’चा जल्लोष होता. दरम्यान, नॉर्वेच्या सामन्याचा आनंद देशातील ५५ लाख लोकसंख्येपैकी २० लाखांहून अधिक जणांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. रॉयल पॅलेस परिसरात या जल्लोषास जास्तच उधाण आले होते. त्यातील काहींनी रस्त्यावरील झाडे उखडून ती भिरकावली. काहींनी रस्त्यावरील फलकांवर चढाई केली. त्यातील काही उखडले गेले. ‘नॉर्वे संघाने अंतिम फेरी गाठली तर काय होईल याची कल्पना केलेली बरी,’ अशी टिपणी अनेकांनी केली.
Maharashtra TimesFIFA World Cup : होणाऱ्या बाळाला गमावलं, तरी देशासाठी मैदानात उतरला; जग जिंकणारा गोल केला अन् फुटबॉलपटू ढसाढसा रडला, अख्खं स्टेडियम स्तब्ध
काही पाठीराख्यांनी मेट्रोचे नुकसान केले. काहींनी मेट्रोवरील जाहीराती फाडल्या. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या अनेक डब्यांच्या छताचे नुकसान करण्यात आले आहे. ‘या जल्लोषात एवढे वहावत जायला नको. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे,’ अशी टिपणी स्पोर्वेईन मेट्रो कंपनीच्या प्रवक्त्यांनी केली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा