Headlines

‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता मार्ग’ १२ ठिकाणी आमनेसामने, पुण्यात प्रकल्पांचा तिढा; मेट्रो आराखड्यात बदलाची शक्यता| Maharashtra Times


Pune Metro and HCMTR: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत असताना महापालिका उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग (वर्तुळाकर मार्ग) बांधत आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये क्रॉसिंग होऊ शकते असं समोर आलं आहे.

पुणे मेट्रो आणि उच्च क्षमता मार्ग
प्रशांत आहेर, पुणे: पुण्यातील दोन महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प असलेले ‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग’ (एचसीएमटीआर) यांच्यात तब्बल १२ ठिकाणी संभाव्य तांत्रिक संघर्ष (क्रॉसिंग) होण्याची शक्यता समोर आली आहे. भविष्यात कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च, पुन्हा खोदाई आणि प्रकल्पांमध्ये विलंब टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने ‘महामेट्रो’ला सावध केले आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला असून, मेट्रोच्या विद्यमान आणि भविष्यातील सर्व मार्गांचे नियोजन करताना ‘एचसीएमटीआर’च्या संरेखन (अलाइनमेंट), उंची आणि वाहतूक आराखड्याचा अनिवार्यपणे विचार करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या जाणार आहेत.

Maharashtra TimesPune News: पुण्यात १२ ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांचं बांधकाम सुरू; ४५९ किमी लांब नेटवर्क; एका वर्षात काम करण्याचं उद्दिष्ट

१२ ठिकाणी संघर्षाची शक्यता

महापालिकेने २०१८ मध्ये तयार केलेल्या एचसीएमटीआर आराखड्याची अंमलबजावणी आता पुन्हा वेगाने सुरू केली आहे. मात्र, या मार्गावर ‘महामेट्रो’च्या विद्यमान; तसेच प्रस्तावित मार्गांशी १२ ठिकाणी क्रॉसिंग होण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे. या ठिकाणी नियोजनात त्रुटी राहिल्यास भविष्यात एखादा प्रकल्प बदलावा लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाकांक्षी एचसीएमटीआर

राज्य सरकारने नुकतीच एचसीएमटीआर, भूमिगत बोगदे आणि पुणे इनर रिंग रोडसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यानंतर एचसीएमटीआर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. सुमारे ३६ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी २१ किलोमीटर विद्यमान रस्त्यांवरून जाणार असून, मेट्रो, बीआरटी, मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि प्रमुख रस्त्यांना जोडणारे हे सर्वांत महत्त्वाचे वाहतूक जाळे असेल.

फेर खोदकाम टाळण्यासाठी हालचाल

सध्या पुण्यात मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड आणि इतर मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे एकाच वेळी सुरू आहेत. अशा परिस्थितीत समन्वय न झाल्यास आधी पूर्ण झालेल्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम, संरचनात्मक बदल आणि सार्वजनिक पैशांचा मोठा अपव्यय होण्याची भीती महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोन्ही संस्थांनी संयुक्त तांत्रिक आराखडा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिका शहराअंतर्गत उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग बांधण्याची योजना आहे. हा रस्ता सुमारे ३६ किलोमीटर लांब असून पूर्णपणे उन्नत असेल. हा मार्ग बोपोडी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, वानवडी, हडपसर, मुंढवा, कल्याणीनगर, येरवडा आणि कळस सारख्या शहरांना जोडणार आहे.

Maharashtra TimesMahalakshmi Travelator Skywalk: देशातील पहिला ‘ट्रॅव्हलेटरयुक्त पूल’, विमानतळानंतर आता मुंबईत बनतोय; मेट्रो-मोनो-रेल्वेला जोडणार

‘महामेट्रो’ला महापालिकेच्या सूचना

  • एचसीएमटीआरच्या संरेखन आणि उंचीचा विचार करूनच मेट्रोचे अंतिम आराखडे तयार करावेत.
  • मेट्रो स्थानके, व्हायाडक्ट, डेपो आणि प्रवेश-निर्गमन मार्ग ‘एचसीएमटीआर ‘शी सुसंगत ठेवावेत.
  • १२ संभाव्य क्रॉसिंग ठिकाणी संयुक्त तांत्रिक बैठका घेऊन अंतिम डिझाइन निश्चित करावे.
  • भविष्यात कोणताही संरचनात्मक अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  • मेट्रो विस्तारात एचसीएमटीआरसाठी इंटरचेंज, फीडर सेवा आणि पार्क-अँड-राइड सुविधा समाविष्ट कराव्यात
सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा